नवीन लेखन...

काळोखी गुहेत (कथा २)

ओडीसा राज्यातील तेंबुली नावाचे खेडे जेथे सामान्य जीवन जगण्याकरता लागणाऱ्या सर्वच वस्तूंची वांनगा आहे. अगदी आशा सुद्धा लुप्त पावलेली आहे.

खेड्याच्या एका बाजूस नक्षलवादीचा तळ त्यामुळे सरकारी कोणतीच यंत्रणा अस्तिवात नाही,

खेड्यातील एक तरुण आदिवासी बाई आपल्या ३ वर्षाच्या छकुलीला कडेवर घेऊन पाणी आणण्या साठी एका ओढ्याकडे चालत निघाली होती. प्रेमाने तिचे नाव ठेवले होते प्रीती झिंटा. हात पायाच्या कड्या, पुढे आलेले पोट. खोल गेलेले डोळे, डोक्यावर हातात पाण्याची भांडी, खाच खळग्याची जमीन तुडवत एका डबक्याकडे चालल्या होत्या, भांडी कपडे धुवायचे आणी तेच पाणी पिण्यासाठी घेऊन यायचे, रोज ५ किमी चालणे तर कायमचे पुजलेले, पाण्याचे कायमच दुर्भिक्ष, पिण्या करता वेगळे पाणी असू शकते हे माहीतच नाही, विजेचा दीवा कधी पाहिलेलाच नाही, जेवणात भाताची पेज, व सुकी चवळी शिजवलेली, बटाटा कधी पाहिलेलाच नाही.

जिल्हा दारीनग्बाडी ७७० स्क्वे.किमी परिसर, जवळ जवळ १ लाख लोकवस्ती, तेबुली खेडे, वस्ती ४०० एक शे लोकांची, गावात ३ आदिवासी आजारी पडले, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी महान प्रयत्ना नंतर रुग्णवाहिका आली, जंगलातून जाताना पोलिसांची गाडी असे समजून नक्षलवादिनी सुरुंग लावून  ती उडवून लावली, सर्व आदिवासी नाहक बळी पडले.

रोज येणारा दिवस येतो  म्हणून जगायचे, दिवस जाता जात नाही, रात्र तर भयाण काळोखी आहेत, एखादी बोअर वेल, त्यातून येणारे पाणी आमची ठाण भागवेल हे तर स्वप्नच आहे. उभ्या ८५ वर्षाच्या आयुष्यात परमानंद शेतकरी म्हणतो, ’यातून येणारे पाणी कसे असते हे मी कधी चाख्लेलेच नाही,घाण पाणी पिण्याने गावातील अनेक आदिवासी अतिसाराने आजारी पडतात, औषध न मिळाल्याने दगावतात, तर रोग्याला बाजेवर टाकून खांद्यावरून १० ते १५ किमी दवाखान्या पर्यंत नेता नेता बरेच जण वाटेतच दगावतात.

पत्रावळी बनवायला लागणारी सिआली पाने गोळा करणे, हा बायकांचा व्यवसाय पावसाळ्यात चालतो. १२ ते १४ तास काम केल्यावर शिकस्त २० रुपये मिळतात, हळदीचे पीक चांगले येते, पण बाजारपेठे पर्यंत रस्तेच नसल्याने माल फार उशीरा पोहचतो, मग पडेल भावाने २० रु किलोने विकतात बाजार भाव ९० रु किलोनी असतो, घरटी जेमतेम ५०० रु सुटतात. गावात एकमेव सिमेंटची इमारत शाळेची, पण शाळेला एखादा शिक्षक, तो सर्व वर्गाना सगळेच विषय  शिकवणार, ८ वीच्या वर संपूर्ण परिसरात कोणी शिकलेले नाही.

माओवादी दहशतीमुळे पंचायतीचा एकही सरकारी नोकर फिरकतही नाही. गेल्या १० वर्षात एकही पोलीस या परिसरात आलेला नाही. वर्षातून एकदा खेड्यातील आदिवासी पैसे गोळा करून भाड्यानी एक विजेचा जनरेटर आणतात, डीव्हीडी वर ओडीसा व हिंदी भाषेतील सिनेमे रात्रभर बघतात, त्या रात्री कोणीच झोपत नाही, जोपर्यंत जनरेटर चालू तो पर्यंत सिनीमे चालू.

एखाद्या काळोख्या रात्री परमानंद शेतकरी भरपूर ढोसतो आणी बडबडू लागतो. ’माझ्या संपूर्ण आयुष्यात मी रस्ते, वीज, पिण्याचे पाणी पाहिलेले नाही, केरोसीन २५ रु.लिटर घेतो आणी मिणमिणती चिमणी लावतो, माझ्या आयुष्यात रात्री घरात उजेड कसा असतो हे पाहिलेलेच नाही, हेच विदारक सत्य आहे.

— डॉ. अविनाश वैद्य.

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..