नवीन लेखन...

भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला कल्पना चावला

कल्पना चावला या भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर होत्या. पूर्ण नाव कल्पना बनारसीलाल चावला. त्यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी कर्नाल, हरयाणा येथे झाला. त्यांचे कुटुंब हे एक मध्यमवर्गीय भारतीय कुटुंब होते. मुलींच्या तुलनेत मुलांना अधिक महत्त्व अशलेल्या समाजात लहानाची मोठी झाली तरही कल्पना यांनी आईच्या मदतीने नेहमी तिच्या स्वप्नांच्या दिशेने मार्गक्रमण केले .कल्पना यांनी शालेय शिक्षण कर्नाल येथे, तर चंदिगड येथून एअरॉनॉटिकल इंजिनिअरींग पूर्ण केले. कल्पना कधीही वर्गात पहिली आली नाही, तरीही कायम पहिल्या पाचमध्ये ती असायची. नासामध्ये काम करण्याचे ध्येय ठेवूनच कल्पना १९२ मध्ये त्या अमेरिकेत गेल्या. त्याठिकाणी त्यांनी एअरोस्पेस इंजिनिअरींगमध्ये एमएससीची पदवी मिळवली. १९८४ मध्ये टेक्सास विद्यापीठातून त्यांनी ही पदवी मिळवली. अॅस्ट्रॉनॉट बनण्यासाठी कल्पना यांना आणखी उच्चशिक्षण घेणे गरजेचे होते. त्यामुळे १९८६ मध्ये त्यांनी आणखी एक मास्टर डीग्री मिळवली. तर १९८८ मध्ये एअरोस्पेस इंजिनिअरींग विषयात पीएचडी पूर्ण केली. नासामध्ये काम करताना कल्पना यांनी येथील रिसर्च सेंटरमध्ये ओव्हरसेट मेथड्स या क्षेत्रात उपाध्यक्षपद मिळवले होते.

नासामध्ये उपाध्यक्षपद मिळवल्यानंतर कल्पना यांना Computational fluid dynamics (CFD) श्रेत्रात संशोधन करण्याची जबाबदारी देण्यात आली. शॉर्ट टेकऑफ आणि लँडींग कन्सेप्टबाबतचे हे संशोधन होते. कल्पना चावला या सर्टिफाइड कमर्शिअल पायलट होत्या. त्यांना सीप्लेन, मल्टी इंजिन एअर प्लेस आणि ग्लायडर चालवण्याचा परवाना होता. ग्लायडर आणि एअरोप्लेनसाठी त्या सर्टिफाइड फ्लाइट इन्स्ट्रक्टरही होत्या. १९९१ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर कल्पना चावला यांनी नासामध्ये अॅस्ट्रोनॉट कॉर्प्सचे सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केला होता. अंतराळक्षेत्रातील योगदानासाठी कल्पना यांनाअनेक पुरस्कार मिळाले होते. स्पेस मेडल ऑफ ऑनर, नासा स्पेस फ्लाइट मेडल आणि नासा डिस्टींग्वीश्ड सर्व्हीस मेडल यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता. डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला. प्रथम अंतराळात पाऊल ठेवल्यानंतर कल्पना चावला म्हणाल्या होत्या की, जेव्हा तुम्ही ताऱ्यांकडे किंवा आकाशगंगेकडे पाहता तेव्हा तुम्ही जमिनीच्या एखाद्या तुकड्यावरून नव्हे तर सौरगंगेतून पाहत असता.

१ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्यास कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचे निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..