काव्य ! कल्पनांचेच मोहोळ
अतरंगी रंगढंगलेले आभाळ
शब्द , मनभावनांची सरिता
काव्य ! कल्पनांचेच मोहोळ।।१।।
क्षणाक्षणाला , उसवित जावे
भावफुलांना , माळीत जावे
अर्थ ! उलगडावा जीवनाचा
दरवळावा कृतार्थतेचा गंधाळ।।२।।
स्पर्श ! शब्दभावनां लाघवी
तनमनांतरा फुलवित जाती
साक्षात्कार ! भावनांमृताचा
काव्य ! कल्पनांचेच मोहोळ।।३।।
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ८१.
२० – ६ – २०२१.
Leave a Reply