कल्याण करी कोण जाणे
खिशात येता अल्लड नाणे
कोणाकडे कसे ते पहाणे
योग्य ठरवावे!!
अर्थ–
कोणाला कधी taken फॉर ग्रांटेड धरू नये. वय, बुद्धी, अनुभव, स्वभाव कोणाचा वरचढ किंवा कोणाचा चांगला याला काही प्रमाण नसते. आपल्या कल्याणार्थ कोण झटतो? कोण त्या मार्गावर चालतोय हे कळण्याची आपली बुद्धी आहे का हे पहिले पडताळून घेणे नेहमी गरजेचे असते.
मी अमुक काम करतो आणि मला एवढे पैसे मिळतात म्हणून सगळी अक्कल मलाच आहे आणि मग समोर असणारी वरिष्ठ, कनिष्ठ, समवयीन व्यक्ती मूर्ख, स्वार्थी, दुसऱ्याचं सुख न पचवणारी आहे असा समज करून आपण आपले तोंड जर वरच्या पट्टीत सोडलेत तर तेथे हनुमानाकडून भिमाचे गर्वहरण झालेच समजा.
बरोबर असणाऱ्या व्यक्ती आपल्यासाठी काय करतायत याची जाणीव ठेवून वागणे म्हणजे एक प्रकारचे अध्यात्मच होय कारण, अहंकार, द्वेष, कडूभाव, निंदा या गोष्टी काबूत आणल्याशिवाय माणूसपण येत नाही आणि माणूसपण नसेल तर भगवंताची कृपा कशी होणार? म्हणून जिभेवर साखर, मनात प्रेम आणि नजरेत नम्र पणा असला की पान वालाही घरी जाताना सुखी होऊन जातो. तर इतर व्यावसायिक सुखी ( पैशाने) होणं सहज शक्य आहे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply