नवीन लेखन...

कमल हासन

यशाचा, अपयशाचा, कारकीर्दीचा विचार करणारे अनेक अभिनेते असतात. अभिनयाचा आणि आपल्या व्यक्तिरेखेचा विचार करणारे अभिनेते अभावानेच आढळतात. कमल हासनचा समावेश असाच ‘विचारी’ अभिनेत्यांमध्ये करावा लागेल. तो प्रत्येक व्यक्तिरेखेचा, कथानकाचा तपशिलात जाऊन विचार करतो आणि भूमिकेची त्यानुसार रचना करतो. कमल हासनच्या या अभिनय वैशिष्ट्याचं दर्शन घडविणारा एक छोटासा चित्रपट महोत्सव दिल्लीत झाला. कमलच्या अभिनय कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चित्रपट महोत्सव संचालनालयानं या महोत्सवाचं आयोजन केलं होतं. अनेक अभिनेत्यांच्या कारकीर्दीचा असा सुवर्ण महोत्सव होतो, मग कमल हासनच्याच चित्रपटांचा असा वेगळा महोत्सव का? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. त्याचे उत्तर सात महिन्यांपूर्वी गोव्यात झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, ज्या कलावंतांच्या कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली, अशा काही प्रमुख हयात कलावंतांचा या महोत्सवात सन्मान करण्यात आला होता. त्या यादीत कमल हासनचे नाव नव्हते. कमलचे नाव नव्हते, त्याचे कारण बहुधा त्याचे वय पाहता, त्याच्या कारकीर्दीला पन्नास वर्षे झाली आहेत, असे मुळात कुणाला वाटलेच नसावे. कमल आता ५५ वर्षांचा आहे. त्याच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात वयाच्या पाचव्या वर्षी ‘कलातूर कन्नम्मा’ या चित्रपटाने झाली. सर्वोत्कृष्ट बाल कमल अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला होता. पुरस्कार आणि व्यावसायिक यश यांची सांगड घातली गेल्याचे भारतात क्वचितच दिसते. परंतु, त्याच्या कारकीर्दीत त्याला स्वतःला आवडणारे, पटणारे चित्रपट आणि लोकांना भावणारे चित्रपट अशा दोन्ही प्रवाहांमध्ये यशस्वीरीत्या वाटचाल केली. सर्वसामान्य प्रेक्षक त्यातला एक स्टाईलबाज, रोमँटिक नायक म्हणून ओळखतो, तर संवेदनशील प्रेक्षकांना त्याची ओळख आहे, एक विचारी अभिनेता म्हणून. स्वतःवर वाजवीपेक्षा जरा जास्तच प्रेम करणारा आणि प्रयोगांच्या आहारी जाणारा अभिनेता म्हणूनही त्याची एक ओळख आहे. केवळ कलाकार म्हणूनच नव्हे तर लेखक, निर्माता, दिग्दर्शक म्हणूनही तो कायम वेगवेगळे प्रयोग करत राहिला आणि आपल्याला असे

प्रयोग करता यावेत म्हणून पैशासाठी तो सामान्य व्यावसायिक चित्रपट करीत राहिला. त्यामुळेच कमलच्या एकूण व्यावसायिक कारकीर्दीचे दोन भाग पडले. ‘अपूर्व ‘मध्ये प्रौढ स्त्रीच्या प्रेमात पडलेला तरुण किंवा मणिरत्नमच्या ‘नायकन’मधली ‘गॉडफादर’ पद्धतीची व्यक्तिरेखा यामुळे कमल हासन अभिनयाच्या एका वेगळ्या उंचीवर पोचतो, त्याच वेळी ‘अप्पूराजा’मधून तो सर्वसामान्य प्रेक्षकांचा ठाव घेतो. हिंदीत कमल इतके यश आणि लोकप्रियता क्वचितच एखाद्या दाक्षिणात्य नायकाला मिळाली असेल. ‘एक दुजे के लिये’ चालला तेव्हा तो आता हिंदीत मोठी खेळी खेळणार असे वाटले होते. परंतु, ‘सागर’, ‘सदमा’, ‘एक नई पहेली’ असे तुरळक अपवाद वगळता त्याने चित्रपटांची निवड कधी गांभीर्याने केली नाही. हिंदीच्या प्रेक्षकांनीही त्याला गंभीरपणे घेतले नाही.

‘राजतिलक’सारखे टुकार चित्रपट करून त्याने हिंदीतले स्थान स्वतःच घालवले. परंतु कारकीर्दीचा असा विचार त्याने तामीळ चित्रपटसृष्टीतही केला. नाही, त्यामुळेच तो संवेदनशील प्रेक्षक आणि पिटातील प्रेक्षक, दोघांनाही आपला वाटत आल आहे. त्याचा एक तोटा असा झाला की, योग्यत असूनही त्याला ‘सुपरस्टार पद’ मिळू शकले नाही. स्वतःला आवडेल, पटेल आणि रुचेल ते करण्याचं जी ‘मस्ती’ त्याने अनुभवली, त्याच्यापुढे ‘सुपरस्टार पदाला काही अर्थ राहात नाही. व्यक्तिरेखांचे, मेकअपचे, शैलीचे प्रयोग करण्याची आपली हौस त्याने पुरेपूर भागवून घेतली. ‘अप्पूराजां’मध्ये त्याने गुडघ्यात पाय दुमडून ठेंगू व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारली. ‘इंडियन’मध्ये तरुण आणि म्हातारा अशी दुहेरी भूमिका केली. चाची ४२० मध्ये तो चक्क नऊवारी नेसून ‘लक्ष्मीबाई’ बनला, तर ‘दशावतार’मध्ये अकारण दहा बटबटीत व्यक्तिरेखा साकारल्या. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘हे राम’मध्येही त्याचा फोकस कायम स्वतःवरच होता. त्याच्या अशा ‘गिमिक्स’पेक्षा त्याने ‘सदमा’मध्ये साकारलेली भावूक, हळवी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना अधिक आवडते, संवादरहित ‘पुष्पक’मधला त्याचा प्रियकर जास्त लोभस ठरतो. त्याचे वेगळेपण तरीही मान्य करावेच लागते. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सामान्य प्रतिनिधींसोबत, साध्या कपड्यांमध्ये उपस्थित राहणारे ‘स्टार’ फार कमी असतील. अशा खऱ्या ‘स्टार’पैकी कमल एक आहे!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..