[embedyt] https://www.youtube.com/watch?v=lV-KS3Xp_s8[/embedyt]
दिवसभर उत्साही राहण्यासाठी ‘ब्रेकफास्ट’ फारच आवश्यक आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे आजकाल बाजारात मिळणार्या रेडी टू मेक नाश्त्याकडे आपण सहज वळतो पण असे पदार्थ खाणे आरोग्यास हितकारी असतीलच असे नाही. मग नाश्त्याला झटपट तयार होणारा आणि आरोग्यासही हितकारी पर्याय म्हणजे ‘पोहे’. सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा मानला जातो. सकाळचा नाश्ता पोटभर असावा. भारतात अनेक ठिकाणी सकाळी नाश्त्याला पोहे खाल्ले जाते. हा नाश्ता पोटभरीचा मानला जातो. जे लोक डाएटिंग करत आहेत त्यांच्यासाठी पोहे खाणे फायदेशीर असते. हे खाल्ल्याने पोटाची ढेरी वाढत नाही. पोह्यामध्ये आवश्यक असलेली व्हिटामिन्स, मिनरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात. पोह्यामध्ये तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या भाज्या टाकून ते आणखी पौष्टिक बनवू शकता. नाश्त्यामध्ये पोह्याचे सेवन केल्याने शरीर स्वास्थ चांगले राहते. शरीलाला एनर्जी मिळते.
पोहे नाश्त्यात खाल्ल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. शरीराला एनर्जी मिळते. तसेच मधुमेहाचा त्रास कमी होण्यास मदत होते. नाश्त्यामध्ये पोहे खाल्ल्यास तुमचे आरोग्य चांगले राहते आणि पोटही भरलेले राहते. ब्रेकफास्ट हेल्दी हवा असेल तर त्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे पोहे. पोहे तुम्ही लंच टाईममध्येही खाऊ शकता. तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे ही कमतरता भरुन काढते. पोह्यामध्ये मुबलक प्रमाणाक लोह असते.
पोह्यांमुळे शरीरात आयर्नची कमतरता किंवा अॅनिमिया जडण्याची शक्यता कमी होते. आयर्नमुळे हिमोग्लोबिनची निर्मिती सुधारते तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सुधारल्याने रोगप्रतिकारशक्तीदेखील सुधारते. पोहे बनवल्यानंतर त्यावर लिंबाचा रस पिळल्यास अधिक चांगल्या प्रकारे आयर्नचे शोषण होण्यास मदत होते. वाटीभर पोह्यातून शरीराला मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्यामुळे पोहे हा नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे. कार्बोहायड्रेसमुळे शरीरात उर्जा निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे वेळी-अवेळी लागणार्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिप्स किंवा बिस्कीटं खाण्याऐवजी पोहे फारच आरोग्यदायी आहेत.
Sanket
Leave a Reply