मी लहान असताना आमच्या रानात राहायला होतो त्यावेळी रानात गावात सुद्धा लाईट नव्हती. गावात ठराविक ठिकाणी ग्रामपंचायतीने बसवलेले रॉकेलचे दिवे होते. रानात तर भयानक अंधार माजलेला असायचा एखाद्यावेळी रातकिडे रात्रीच्यावेळी फिरत होते. या रात किडयाला आजी काजवा असे म्हणत. काजव्याच्या प्रकाशातून थोडे फार शेतीचे दर्शन व्हायचे. परंतु हेकिडे रात्रीच्या अंधारात मला सुंदर असे दिसत होते. आमच्या घरामध्ये एक मिणमिणता रॉकेलचा दिवा व दुसऱ्या बारक्या खोलीत एक कंदील. याचं कंदिलाच्या प्रकाशात मी अभ्यास करीत असे परंतु निसर्गातील झाडावरच्या पशु पक्षाने केलेली हालचाल. त्यांचे ओरडणे मधेच घू असा आवाज काढणारे घुबड मधेच ओरडत होते. अधून मधून माझ्या मनाला भीती वाटत असे दिवसभर कष्ट करून शेतात काम करणारे शेतकरी. रात्रीच्या वेळी निवांत झोप घेता त त्यांना रात्रीच्या वेळी त्या पक्षांचा आवाज व त्यांच्या पंखांचा आवाज कुठून येणार. परंतु राणची गार हवा हिरवागार निसर्ग हे माझ्या मनामध्ये आनंद निर्माण करत होते. परंतु रात्रीच्या वेळी आवाज करणारे झाडावर विश्रांती करणारे पक्षी त्यांचा आवाज अजून पर्यंत माझ्या कानावर आहे. हा मंद मंद प्रकाश देणारा कंदी अजून माझ्या लक्षात आहे एवढे मात्र निश्चित. लहानपणाच्या सुखद आठवणी अजून आठवतात त्या वेळची प्रेमळ मनाची माणसं आता निघून गेली. सध्या तर सर्वच ठिकाणी लाईट आली आहे परंतु लाईट मध्ये वावरणारी माणसं सैराट अवस्थेत इकडून तिकडे फिरतात. फिरताना कोण कोणाशी बोलत नाही जो तो आपापल्या वाटेने निघून जातो. अलीकडची माणसे शिक्षणाच्या जोरावर ती कोण बोलत नाही. पूर्वीचे दिवस गेले राहिल्या फक्त आठवणी..।
.. धन्यवाद..।
-–विशाल
Leave a Reply