२६.०२.१९
संदर्भ – विविध टी. व्ही. चॅनलवरील आजच्या बातम्या :
भारताचा POK मधील तीन दहशतवादी कँपस् वर यशस्वी हवाई हल्ला
• पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला आज भारतानें चोख प्रत्युत्तर दिलें, आणि आपल्या हवाई दलानें सर्जिकल स्ट्राइक करून POK मधील ३ वेगवेगळ्या ठिकाणचे दहशतवादी तळ संपूर्ण उध्वस्त करून दहशतवाद्यांची मोठी जीवितहानीही केली. कुठलीही सिव्हिलियन कॅज्युअल्टी झालेली नाहीं.
• या हल्लानें पाकिस्तानच्या वल्गनांना चोख प्रत्युत्तरही दिलें आहे. आजवर भारत फक्त तोंडी reaction देत असे, केवळ निषेध करत असे. आज त्यानें, पाकिस्तानला समजेल अशा भाषेत ठोस प्रत्युत्तर दिलें.
• यानंतर पाकिस्तानची भलतीच गोची झाली आहे.
– ‘हे हल्ले दहशतवाद्यांच्ता तळावर होते’, असें त्याला म्हणतां येत नाहीं, कारण पाकिस्तानचा ऑफिशियल स्टँड आहे की आमचें सरकार दहशतवाद्यांना सपोर्ट करत नाहीं, आमच्याकडे असे तळ नाहींतच.
– बरें, याला ‘भारताचें पाकवर आक्रमण’ असेंही म्हणतां येत नाहीं. कारण हे हल्ले ज्या ठिकाणांवर झालेले आहेत, ती आहेत POK मध्ये. काश्मीर ही डिस्प्यूटेड टेरीटरी आहे, असा कंठशोष पाक करत असतो. म्हणजेच, त्या दृष्टीनें POK हा भूभाग डिस्प्यूटेडच आहे. त्यामुळेंच तर, त्या भूभागात भारत-पाकमध्ये इंटरनॅशनल बॉर्डर नसून ‘लाईन ऑफ कंट्रोल’ ( LOC) आहे.
POK हा काश्मीरचा भाग असल्यानें, भारत तर तो आपलाच प्रदेश मानतो, कारण महाराजा हरिसिंहांनी जे. अँड के. भारतात विलीन केलें होतें . त्यामुळें भारत पाकचें त्याबाबतीत कांहीं ऐकूनही घेणार नाहीं.
• म्हणून पाक सरकारपुढे प्रश्न उठला की, काय बोलून निषेध करायचा ? अखेरीस त्यानें, ‘भारतानें LOC पार करून हल्ले केले’, अशा शब्दांत निषेध नोंदवला आहे.
• यामुळे पाकचेंच हंसें होणार आहे. कारण पाक तर जवळजवळ रोजच LOC च्या सँक्टिटीचें उल्लंघन करतो. तो पलिकडून भारतीय troops वर मारा करतो . एवढेंच नव्हे, तर तो LOC उल्लंघून दहशतवादीही पाठवतो. त्यामुळे, तो कुठल्या तोंडानें तक्रार करणार? आणि केलीच तर, इंटरनॅशनल कम्युनिटीत, चीन सोडला तर, कोण त्याचें ऐकून घेणार?
• कांगावाखोर पाकिस्ताननें चोराच्या उलट्या बोंबा मारल्या खर्या ; मात्र त्याचा उपयोग शून्यच आहे. म्हणजे, यशस्वी हल्ला झाला तो झालाच ; पण त्याबद्दल तक्रारही करतां येत नाहीं , आपलें हंसेंच होत आहे, अशी पाकची कोंडी झालेली आहे.
• हें फार छान झालें . Worth celebrating. यशस्वी हल्लाही आणि पाकची गोचीही.
— सुभाष स. नाईक.
टिप्पणी- २६०२१९/२
Leave a Reply