कन्या रत्न हे जन्मता
सदा असावे स्वागता
जाईची रे भासे कळी
ह्या अंगणामध्ये ती रांगता
का खुडता रे सुगंधी कळी
तीचं नशिब असे तीच्या भाळी
का रक्ताने हात माखता
घेऊन तो निष्पाप बळी
आई म्हणजे ईश्वर असे
मुलीमध्ये तो का न दिसे
भावी जगाची तीच आई
उमटते सोनपावलांचे ठसे
शिवा जन्मला जिजा पोटी
सावित्री झाली क्रांती ज्योती
अन्यायाचा करण्यास अंत
राणीच्या हाती तलवार होती
येऊ द्या तीला ह्या जगती
वंशाची समजा पणती
पाहू द्या हे जग तीला ही
आनंदाच्या क्षणासंगती
आकाशी ती घेईल भरारी
घेईल जिंकून दुनिया सारी
फक्त एकदा जन्म घेऊ द्या
करील जादू ती सोनपरी
कवी – महेश सुखदेव पुंड
तामसवाडी,ता – नेवासा, जि – अहमदनगर
मो.नं – 8459043090
Leave a Reply