नवीन लेखन...

भारताचा सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू कपिल देव

कपिल देव यांचा जन्म ६ जानेवारी १९५९ रोजी झाला.

रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य.

रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला. नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी खेळला आणि सहा बळी मिळवले. त्या हंगामात ३ सामन्यांमधून १२ बळी त्याने मिळवले. १९७६-७७ च्या हंगामात जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात त्याने एकूण ३६ धावा देत ८ बळी घेतले. हा सामना हरयाणाने जिंकला.

नंतरच्या साखळी सामन्यांमधून कपिलची कामगिरी यथातथाच राहिली असली तरी उप-उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात बंगालविरुद्ध त्याने दुसऱ्याह डावात केवळ नऊ षटके गोलंदाजी करताना २० धावा देत तब्बल ७ गडी बाद केले. उप-उपांत्य सामन्यात हरयाणाची गाठ मुंबईशी पडली आणि हरयाणाने लढत गमावली असली तरी कपिलदेवने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. १९७८-७९ च्या हंगामात इराणी चषकाच्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन कपिलने ६२ धावा काढल्या.

दुलीप चषकाच्या अंतिम सामन्यातील सात बळीनी त्याला उत्तर विभागाच्या संघात प्रवेश मिळवून दिला आणि याच हंगामात कपिल पहिली कसोटी खेळला – पाकिस्तानविरुद्ध. १९७९-८० च्या हंगामात दिल्लीविरुद्ध १९३ धावांची खेळी हे त्याचे पहिले प्रथमश्रेणी शतक. या हंगामात तो हरयाणाचा कर्णधार होता आणि त्याच्या संघाने अतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

१९९०-९१ च्या रणजी करंडकाचा अंतिम सामना कपिलने गाजवला. संजय मांजरेकर, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, सलील अंकोला, ॲ‍कबी कुरुविला अशा दिग्गजांचा समावेश असलेल्या मुंबई संघाला हरयाणाने पराभूत केले. हरयाणाच्या संघातील काही खेळाडू होते : दीपक शर्मा, अजय जडेजा, चेतन शर्मा, विजय यादव. मिळालेल्या शिकारींकडे पाहिल्यास कपिल त्याच्या पहिल्यावहिल्या कसोटी मालिकेत फारसा यशस्वी ठरला असा निष्कर्ष काढता येणार नाही पण त्याच्या बाऊन्सर्सची दहशत पाक फलंदाजांनी घेतली होती आणि त्याचा फायदा इतर गोलंदाजांना नक्कीच मिळाला होता. सादिक मोहम्मदला त्याने एका बहिर्डुल्यावर टिपले होते. मालिकेतील तिसऱ्यां सामन्यात कराचीच्या नॅशनल स्टेडिअमवर त्याने अवघ्या ३३ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते. भारतीयाचे कसोट्यांमधील हे पहिले अर्धशतक. मग कपिलने एक पंचांकडे फलंदाज बाद असल्याचा आग्रह धरण्यासाठीचा अपवाद वगळता, कारकिर्दीत केव्हाही मागे वळून पाहिले नाही.

दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर त्याचे पहिले कसोटी शतक आले, अवघ्या १३० चेंडूंमध्ये. १९८२-८३ च्या हंगामात गावसकरला विश्रांती देण्यात आल्याने कपिलवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. वेस्ट इंडीज दौऱ्यापासून तो नियमित कर्णधार बनला आणि त्या दौऱ्याावर त्याच्या संघाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे वेस्ट इंडीजला एका एकदिवसीय सामन्यात हरविणे! गावसकरने या सामन्यात ९० तर कपिलने ७२ धावा केल्या होत्या आणि ४७ षटकांमध्ये २८२ धावा करून भारतीयांनी त्या राखल्या होत्या.

१९८३ कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड मध्ये १९८३ साली आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. यावर नुकताच 83 नावाने चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..