नवीन लेखन...

कारण ती घरीच असते

व्यापता न येणारं अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम म्हणजे आई. तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणे अशक्यच आहे. आपल्या आधी तिचा दिवस चालू होतो. सर्वांच्या आवडी निवडी, कामाच्या वेळा, लहान-मोठ्यांची काळजी आणि घर सांभाळताना स्वत:ला ती पूर्णपणे विसरते. तसे पाहिलं तर गृहिणीच्या कामाचं आणि तिच्या त्यागाचं काहीच मोल नसतं. घरातला प्रत्येक जण तिला गृहीत धरत असतो. एकाच वेळी आई, सून, मुलगी, पत्नी, वहिनी, आजी अशा अनेक जबाबदाऱ्या ती कोणतीही तक्रार न करता पार पडत असते. तिच्या कामाचा मोबदला सोडाच पण साधं कौतुकही तिच्या वाट्याला येत नाही. घरातला प्रत्येकजण तिला गृहीत धरत असतो.

‘अगं ऐकतेस का आज बंटीची शाळेची बसं येणार नाहीये, मला वेळ नाही. त्याला शाळेतून तूच आण कारण तू घरीच आहेस ना.’

‘अगं माझा चार्जर कुठे ठेवला आहेस. सापडत नाही, बॅटरी लो झाली आहे. आधी मला तुझा चार्जर दे मग तू तुझा फोन चार्ज कर कारण तू घरीच असतेस.’

‘आज मला ऑफिसला लवकर जायचे आहे आधी पेपर मला दे तू तर घरीच आहेस ना नंतर कधीही वाच.’

‘दोन तीन दिवस मी ऑफिसमध्ये खूप बिझी आहे. Month End आहे आणि मोठे साहेब पण येणार आहेत तेव्हा Please तू आई बाबांची औषधे घेऊन ये कारण तू घरीच असते.

‘तू घरी आहेस तर बंटी आणि पिंकीच्या युनिट टेस्टची चांगली तयारी करून घे.’

‘अहो आपल्याला शाळेत parent meeting ला जायचे आहे. अगं पण मला कसे शक्य होणार, ऑफिसमध्ये कामाचे Pressure आहे. मला काही जमणार नाही. मुलांच्या parent meeting ला तूच जा ना. तू तर घरीच असतेस ना.’

‘आज मी मित्राबरोबर बाहेर जेवायला जाणार आहे. मुलं कंटाळतील तर तू संध्याकाळी त्यांना गार्डनमध्ये फिरायला घेऊन जा कारण तू घरीच आहेस ना.

‘अगं पुण्याच्या मामा मामीचा फोन आला होता. ते दादरला लग्नाला येत आहेत. मी त्यांना सांगितलंय की तुम्ही आमच्याकडेच रहायला या आमची ही घरीच आहे.’

‘अगं उद्या पिंकीचा वाढदिवस आहे ना तर तू तिच्या आवडीची पावभाजी कर आणि तिच्या मित्रमैत्रिणींसाठी केक पण कर. आराम काय तुला रात्री पण करता येईल. कारण तू घरीच आहेस.’

‘अगं ऐकतेस का मी आज खूप दमून आलो आहे. जरा मला कडक चहा दे आणि स्वयंपाक पटकन करून मला जेवायला वाढ कारण तू घरीच आहेस.’

मैत्रिणींनो,
घराबाहेर पडणाऱ्यांची प्रत्येक गोष्ट महत्त्वाची. मात्र तिच्या प्रत्येक इच्छेला, आवडीनिवडीला दुय्यम स्थान कारण ती घरीच असते. खरंचं का एवढं सोपं आहे घरी रहाणे. समजून घ्या, उमजून घ्या. स्त्रियांचा सन्मान करायला शिका कारण ती घरीच असते म्हणून घराला घरपण असते.

अखेरीस एवढेच सांगावेसे वाटते की,

ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया कुठल्याच स्त्रीचा जन्म कधीच नसतो जात वाया कधी मुलगी कधी पत्नी कधी आई होत असते सासर माहेर उजळवणारी स्त्री एक ज्योत असते.

धन्यवाद !

-पद्मजा रिसबुड

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..