संथ झुळझुळणारी सरिता
किनारी जलझरे वाळवंटी
विराट पिंपळवृक्ष, पारावरी
साक्षी आजही अनादीकाली
अदृश्य भिरभिरणारे आत्मे
घुटमळती! मुक्तीसाठी
कर्मकांडांत गुंतलेले जीव
हताश भावनिक मायापाश
काहूर! अंतरी गतस्मृतींचे
काकस्पर्श, पिंड, तिलांजली
सारेच, केविलवाणे प्रघात
अविरत झुळझुळणारी गंगा
संस्कार अंती मोक्षासाठी
भावकल्पनांच्याच श्रद्धा
केवळ सांत्वन मनामनांचे
अखंड प्रवाहपतीत सरिता
अव्यक्त! सारेच दुर्बोध
कासावीस ती ताटातूट
पराधिन, असमर्थ जीव
रामेश्वरा सामोरी गंगायमुना
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १११.
२१ – ८ – २०२०.
Leave a Reply