नवीन लेखन...

कर्णfool…..

घरात टी व्ही पहात असताना डोक्यावर भणाणता पंखा असल्याने , पात्रांचे संवाद नीट ऐकू येत नव्हते . मी आवाज मोठा करायला सांगितल्यावर ” अजून ? ” अशी मोठ्ठ्याने सामुदायिक पृच्छा झाली . मी ” हो ” म्हणाल्यावर सर्वांनी एकमेकांकडे पाहून भुवया उंचावल्या .

काही दिवसांनी हेडफोनस् लाऊन यू ट्यूब वरची गाणी ऐकत होतो. दरवाज्याची बेल वाजली . कोणीतरी जाईल दरवाजा उघडायला असा विचार करून मी जागचा हललो नाही . मला बेल ऐकूच आली नाही म्हणून मी उठलो नाही असा सगळ्यांचा ग्रह झाला.

आणि मला परस्पर बहिरा ठरविण्यात आलं . मी नको नको म्हणत असताना मला नामांकीत कानतज्ञाकडे घेऊन गेले. त्यांनी यंत्राद्वारे बराच वेळ तपासणी करून मी बहिरा या संज्ञेत मोडणारा नसल्याचे हळू आवाजात सांगितले. तीही एक तपासणी होती की काय देव जाणे! त्यांची जाडजूड फी भरून बाहेर आलो. त्या रकमेत घसघशीत डाग नाही परंतु कानावरची भिकबाळी तरी झाली असती.

घरी येऊन बायकोला सगळा वृत्तांत कथन केला. डॉक्टरांच्या मतावर तिचा विश्वास बसत नव्हता. ” मला नाही बुवा पटत. पहा , तुम्ही हवं तर कानाच्या आणखी मोठ्या डॉक्टरांना दाखवून घ्या ” तिने मला सल्ला दिला. ” चालेल. जातो. पण त्यांचेही असेच मत पडले तर त्यांची फी तू द्यायची ” मी वैतागून मोठ्ठयाने ओरडलो. त्यावर , तिने स्वतःचा कर्ण होऊ न देता ” आत्ता जे काही बोललात त्यातले मला का…ही ऐकू आले नाही ” असे म्हणत कानावर हात ठेवले .

आता बोला. यापुढे कोणाचेही ऐकून मी कर्ण fool होणार नाही……

अजित देशमुख (नि)
अप्पर पोलीस उपायुक्त,
9892944007
ajitdeshmukh70@yahoo.in

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..