‘आप’मधे केजरीवाल विरूद्ध कपील शर्मा, ‘बीएसपी’त मायावती विरूद्ध नसिमुद्दीन सिद्दीकी यांनी त्यांच्या त्यांच्या सर्वोच्च नेत्यांवर लावलेल्या आरोपातून काय
सिद्ध होतं? हेच, की राजकारण आणि पक्ष ही कमी वेळात भरपूर पैसे कमवायचं उत्तम साधन आहे. याला कोणताही पक्ष अपवाद नाही. नेत्यावर आरोप करणारे दोघही त्या नेत्याची अत्यंत जवळची माणसं आहेत हे ध्यानात घेतलं, तर त्यांच्या आरोपात तथ्य असावं असं दिसतं.
इतकी वर्ष सोबत असून त्यांना नेत्याच्या भ्रष्टाचाराचा साक्षात्रार आताच का व्हावा याला दोन कारणं आहेत. एक म्हणजे, पैशांच्या व्यवहारात ते ही सामिल असावेत परंतू आता त्यांना त्यांचा योग्य वाटा मिळाला नसावा. आणि दुसरं म्हणजे, आरोप तरणारांकडे केलेली मागणी आरोप करणाऱ्यांच्या क्षमतेपलिकडली असावी.
राजकारणात कुठल्याही स्तरावर कार्यरत असणाऱ्या सर्वपक्षीयांनी यावरून धडा घ्यावा. सर्वात जास्त धोका सर्वात जवळच्या माणसांकडून आणि नातेवाईकांकडूनच असतो.
अर्थात ‘कर नाही त्याला डर नाही’ हे खरं असलं तरी टेबलाखालूनचे व्यवहार ‘कर’त नाही तो राजकारणात येऊच शकत नाही हे ही खरंय, त्यांना आपल्याच माणसांना ‘डरून’च राहायला हवं..!!
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply