नवीन लेखन...

कर्ता आणि ज्ञाता

कुंभार व्हायचे ठरवणाऱ्या माणसाला काहीतरी घडवायचे असते मातीतून. त्याच्या बोटांची आणि मातीची दोस्ती पटकन् जमते. हा त्याचा अंगभूत गुण असतो (संचित. म्हणजेच गुणसूत्रांबरोबर आलेले वैशिष्ट्य). पण हा माणूस उत्तम कुंभाराकडे शिकतो सुद्धा. म्हणजे त्याच्यावर होतात संस्कार अर्थात् Conditioning through learning. त्याचे कसब सरावाने पक्के होते. स्वतंत्र निर्मिती करण्याचे ज्ञान मिळू लागतेआणि तो आता ज्ञाता होतो. त्याच्यापायाभूत पात्रतेवर आधारित असे ध्येय तो ठरवतो. ‘मी आता उत्तम मडकी तयार करायला सुरुवात करणार आहे हा हेतू, हे ध्येय म्हणजे ज्ञेय. अमुक पद्धतीने, एवढ्या टप्प्यांचावापर करून मडके करायचे आहेहे ज्ञान (Knowledge ). माती, चाक म्हणजे “करण (Resources) तर प्रत्यक्ष बनवण्याचे दृश्य म्हणजे ‘क्रिया”. यातून बनलेले मडके म्हणजे कर्म. निर्मिती पूर्ण झाल्यावर कुंभाराच्या मनात विचार येतो, “कोणी बनवले हे मडके?” आतून उत्तर येते, मी…मी मी! आणि ‘कर्ता’ निर्माण होतो.

माझे मडके, माझे कसब, माझे चाक’मी’ची मांड सर्वांवर बसू लागते. ज्ञानेश्वर म्हणतात की मनामध्ये ‘कर्मसंकल्प’ तयार झाला की वाचेचा दिवा लागतो. वाचेची मशाल घेऊन कर्तृत्वाचा व्यापार सुरु होतो. शरीर – मन कामं करु लागतात. मडक्यांच्या उत्पादनाबरोबर विक्रीसाठीची व्यवस्था लावली जाते. उत्तमातली उत्तम मडकी अग्रभागी ठेवली जातात. न गळणाऱ्या मडक्यांचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. विक्रीचा मोबदला मिळायला लागतो. त्याचे प्रमाण वाढत जाते. कुंभाराच्या गरजा वाढत जातात. त्याची जीवनशैली बनू लागते. शिवाय आता उद्दिष्ट असे निर्माण होते की ‘माझेच मडके जास्त खपले पाहिजे.’ ज्ञेय म्हणजे Goal प्रिय असल्याने अधीरता निर्माण होते. न फुटणारे मडके बनविण्यासाठी संशोधन विभाग बनतो. ‘जगातली सर्वोत्कृष्ट मडकी येथे बनतात.’ असली जाहिरात-मोहिम सुरु होते. दरम्यान मडके, माती, चाक ह्या सर्वांवरचे बौद्धिक हक्क, कॉपीराईटस् असे सर्व स्मामित्व सिद्धतेचे टप्पे पार पडतात. आता

कुंभाराची बुद्धि मन चित्त आणि अहंकार (Self belief) असे सारे कामाला लागले आहेत. कुंभार महाकुंभार बनून Potteries’ अर्थात् EP ह्या कंपनीचा चेअरमन झालायू . . . . जगभर फिरतोय. सुखी दिसतोय पण हे काय . . . वाढलेले बीपी, कोलेस्टेरॉलची चढाई आणि निद्रानाश . कुठे हरवला ह्या सुखी माणसाचा सदरा?

डॉ. आनंद नाडकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..