फुलेल नातं तुझं माझं
करून बघ एक उपाय
नको विचारुस पुन्हा पुन्हा
खरं काय? खोटं काय?——!!
तोलू नकोस ताजव्यात
आल्या गेल्या क्षणांना
काठावरच बसून रहा
सोडून फक्त पाण्यात पाय
नको विचारुस पुन्हा पुन्हा
खरं काय? खोटं काय?——!!१
माझ्या मनात तूच आहेस
चाचपडणं सोडून दे
खदखदतंय मनात जे
अलगद त्यावर धरेल साय
नको विचारुस पुन्हा पुन्हा
खरं काय? खोटं काय?——!!२
मोजु नकोस वळणं वेडी
घालु नकोस अवघड कोडी
वळून बघ तुझ्यामागे
पाऊल माझं पडत जाय
नको विचारुस पुन्हा पुन्हा
खरं काय? खोटं काय?——!!३
………. मी मानसी
Leave a Reply