प्राचीन काळातील आपल्या देशातील धार्मिक विधींमध्ये कापराचा वापर केला जातो. कापराचा सर्वाधिक वापर आरतीत केला जातो.
कापराचे काही गुणधर्म
धार्मिक कारण
शास्त्रानुसार देवी- देवतांनसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव रहात नाही. कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.
वैज्ञानिक महत्त्व
वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की , कापराच्या सुगंधाने जीवाणू , विषाणू , लहान किटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर रहातात.
कापूराचे अजून काही फायदे
१) सर्दि-पडस व्हायची लक्षणे आसताना एका रूमालात ३-४ कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दि-पडसे होत नाही.
२) कापूराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास निघून जातो.
३) कपूराच्या वासाने आपल्या मेंदूतील लेकवस् नामक रसायन अधिक सक्रीय होते. याचा उपयोग आपल्याला निर्णयक्षमतेत होतो.
४) कापूराचा रोज ३ वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखायची क्षमता वाढते.
५) घरात कापूर रोज लावल्यावे अॉक्सिजन ९-११% टक्के ईतका वाढतो.
६) मुठभर कापूर तव्यावर ४० सेकंद तापवून ते एका रूमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिल्यास , घसा बसला असेल तर बरा होतो. तसेच हा शेक भुवयांच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.
७) मुठभर कापूर + दालचीनी + लसूण एकत्र एका सुती कपड्यात बांधून गाडीच्या बोनेट च्या आत ही पूडी ठेवल्याने काही वेळ तरी उंदीर व घूशी येत नाहीत.
८) पण कापूर हा उगाच अति जाळू नये. कारण अति धूराने डोळे झोंबतात आणि त्याचा वाईट परीणामा भुबुळाच्या पाठील टिशूस् वर होतो.
९) गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्याने दुखाणे कमी होते व फुगलेल्या शीरा खाली बसतात. ( ५०शी ओलांडलेल्यांना अधिक उपयोगी )
कापूराच्या सुगंधाने एक नवचैतन्य निर्माण होते मनात.
— डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ज्ञ, मुंबई
9820584716
Leave a Reply