सर्व उपाय आपल्यामध्येच असतात. स्वतःला सांगितलेल्या कथांच्या खाली ते लपलेले आहेत. हे खोटेच आपल्याला सुरक्षित आणि संरक्षित ठेवतात. या अशा भ्रमांना आपण निरंतर आव्हान दिले पाहिजे किंवा नष्ट केले पाहिजे. आपल्या अंतःकरणात काय आहे हे फक्त आपल्याला माहित असते.
आपल्या आजूबाजूला सर्वत्र विचार असतात आणि आपण आपल्या भावना त्यांच्याशी जोडताच त्या सर्वांमध्ये एक चुंबकीय शक्ती निर्माण होत असते.
आपला मार्ग आपली ओळख असतो. तोच आपण कसे आहोत आणि जगाला काय दाखवित असतो, याचा आरसा असतो. तेच जर खरं नसेल तर? सत्य लपवता येते का? या दूरवरच्या हाका कशा दडविता येतील? आपणास काय हवे आहे हे जाणून घेण्यासाठी खूप धैर्य, वेळ आणि शक्ती लागते.
हा म्हटलं तर एकट्याचा प्रवास असतो, म्हटलं तर मदत करण्यासाठी आधार , उत्तरदायित्व पेलण्याची शक्ती आणि प्रशिक्षकांची गरज असते. आमची आव्हाने जशी दिसतात तशीच ती कधी असत नाही; ती खूप सखोल असतात.
तुम्हाला असं वाटतं का ताण हे आयुष्यातील एक आव्हान आहे, पण प्रत्यक्षात ते हिमनगाचे एक टोक असते. आपल्या हृदयाचे अनुसरण करणे निवडले तर काय होईल हे माहित नसण्याची भीती ही खरी भीती असते.
आपल्या कार्याचा आनंद घेणे हेच जीवनप्रवाहाचे रहस्य आहे.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply