नवीन लेखन...

ग्वाल्हेर घराण्याचे जेष्ठ गायक काशिनाथ बोडस

काशिनाथ बोडस यांच्या घरातच गायनाची समृद्ध परंपरा होती. त्यांचा जन्म ४ डिसेंबर १९३५ रोजी झाला. तात्या उर्फ पं. काशिनाथ शंकर बोडस हे ग्वाल्हेर घराण्याचे गायन होते. काशीनाथ बोडस यांचे वडील पं. शंकर श्रीपाद बोडस व काका लक्ष्मणराव बोडस हे विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य होते.

काशीनाथ बोडस हे सुरूवातीस तबल्या कडे आकर्षित झाले, पण नंतर त्यांनी गायन शिकण्यास आपल्या वडिलांकडून सुरवात केली. त्यांची गायन करण्याची शैली आपल्या वडिलांसारखेच होते. त्यांचे ख्याल, ताराना आणि भजन यावर प्रभुत्व होते. वीणा सहस्रबुद्धे या त्यांच्या भगीनी. वीणा सहस्रबुद्धे यांनी काशिनाथ बोडस यांना गुरू मानून त्यांनी गाणे शिकायला सुरुवात केली होती.

पं. कुमार गंधर्व यांच्या गायन शैलीवर काशीनाथ बोडस यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या शिष्यात रंजणी रामचंद्रन, रचना बोडस, सुषमा वाजपेयी आणि मनु श्रीवास्तव यांचा समावेश आहे. काशिनाथ बोडस यांचे २० जुलै १९९५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
काशिनाथ बोडस यांची अधिक माहिती असल्यास सांगावी.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..