कसली ही चांदण चाहूल सख्या
काहूर उठतात मनात अनेकदा,
हे मोती धवल शुभ्र टिपूर असे
शिंपल्यात हृदय चोरुन माझे आता
तुझी ओढ लागते हलकेच ती
मिटतात नयन माझे अलगद तेव्हा,
ये सख्या तू असा घनशामल वेळी
मी अबोल गुंतली तुझ्यात आता
ये बहरुन सख्या तू असा
भाव गंधित मोहरून जरा,
स्पर्श तुझा मधुर मज होता
मोरपीसी सर्वांग शहारे माझे तेव्हा
घे ओठ ओठांनी तू टिपून
मिठीत मज घट्ट अलवार घेता,
साखर ही फिकी पडेल तेव्हा
ओठ अलगद तू माझे चुंबीता
केतकीच्या बनी ये तू सख्या
केवड्याच्या गंध घे मिटून असा,
गंधाळेलं तुझ्यात ही रातराणी
सोडून लाज लुटले तुझ्यात मी आता
प्रणय खेळ हा रंगून जाईल असा
रोमांच उठेल तनुभर अबोल मना,
अलवार मिठी तुझी मखमली गोड
मी रातराणी सवे गंधाळेल तुझ्यात जरा
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply