पाचवीच्या वर्गाचा क्लास टीचर सध्या सुटीवर असल्याने, रक्षिताकडे त्या वर्गाच्या क्लास टिचरचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला होता.
रक्षिताने हेडमिस्ट्रेसच्या केबिनच्या दाराला नॉक केले.
“या, या आत या!” हेडमिस्ट्रेस दातार मॅडम म्हणाल्या.
रक्षिता आत गेली.
“हू, काय काढलास रक्षिता?”
“काही तरी तुमच्या कानावर घालायचं आहे!”
“बोल.”
“माझ्या वर्गात म्हणजे, पाचवीच्या वर्गात काही तरी गडबड आहे!”
“नेमकं काय आहे?” कपाळाला आठ्या घालत दातार मॅडमनी विचारलं. हि रक्षिता न, पाल्हाळ लावणारी आहे. पटकन मुद्याचं सांगायची नाही.
“मुली लंच अवर्स मध्ये, शाळेच्या पायऱ्यांत घोळका करून काही तरी कुजबुजत असतात.”
“आग रक्षिता, मुलींचं वाढत वय असत, असतील बोलत मनातलं आपसात.”
” तस नाही मॅडम, ते मी समजू शकते! पण हे वेगळंच आहे! आधी इंटरव्हल मध्ये, डब्बे खाऊन पोरी ग्राऊंडवर हुंदडायच्या, हल्ली तस दिसत नाहियय!”
” रक्षिता, तुला नेमकं काय सुचावायचं आहे?”
“ती नवीन आलेली मुलगी, केतकी, एकटी एकटी असायची, ती आता मुलीच्या गराड्यात असते!”
“मग?”
“मी असं ऐकलंय कि —”
” हे पहा रक्षिता, मला खूप काम आहेत! तू तुझा प्रॉब्लेम सांगणार नसशील तर, तू तुझ्या वर्गावर जा! तुला फक्त दोनच मिनिटे देते, काय सांगायचं असेल ते सांगून टाक! युवर टाइम स्टार्टस नाऊ!” दातार मॅडम खरेच वैतागल्या.
रक्षिताला फारसा फरक पडला नाही. हे तिला नेहमीचच होत!
“मी असं ऐकलंय कि ती केतकी, मुलींना भूताच्या गोष्टी सांगत असते आणि आपली फ्रेंड्स सर्कल वाढवतीयय !”
“वाढवेना, तुला काय प्रॉब्लेम आहे?”
“तस नाही, गेल्या चार दिवसापासून शकुंतला शाळेत आली नाही!”
हि रक्षिता किती इरिलेव्हंट बोलतीयय?
“त्याचा इथे काय संबंध?”
” आहे! शकुंतलेची आई माझी मैत्रीण आहे! मी तिला फोन करून विचारलं!”
“काय म्हणाली?”
“म्हणाली, शकू खूप घाबरली आहे! ती एकटी अजिबात रहात नाहियय! अंधाराची तिला खूप दहशत वाटत आहे! आपल्या घरात ‘भूत’ आहे! हा घोषा तिने लावलाय!”
दातार मॅडम आता मात्र गंभीर झाल्या. अशी भीती कोवळ्या वयात मनात घर करू लागली, तर मुलीच्या भविष्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता असते. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जाऊ शकतो! हे त्यांना जाणवल.
“बापरे! असे असेल तर, प्रकरण गंभीरच आहे!”
“खरी बातमी तर पुढेच आहे! या शनिवारी, काही मुलींना तिने घरी बोलावले आहे! ती त्यांना ‘भूत’ दाखवणार आहे!”
“खरे कि काय? मला काय वाटलंय, आपल्या शिक्षिकापैकी कोणीतरी त्या मुलीनं सोबत केतकीच्या घरी जावं! तिच्या आई वडिलांन देखत तिची समजूत काढावी. ‘अशी भुताची भीती दाखवत जाऊ नकोस.’ हे सांगावं.” दातारांनी आपला विचार मांडला.
“मलापण असच वाटतंय!” रक्षिता म्हणाली.
” कोणाला बरे पाठवावं? खरे तर मीच गेले असते, पण मला नेमकं शनिवारी समीरला आणायला एरपोर्टला जायचंय! रक्षिता तूच का नाही जात मुलीनं सोबत? मुली तुझ्या सहवासातल्या आहेत. तू सोबत असशील तर त्यांना, आधारहि वाटेल!”
“ठीक आहे! जाते मी!”
Leave a Reply