महाराज कृष्णकुंभांनी राजकुमारी कृष्णाकडे नजर टाकली. आज काहीतरी बिनसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांना काय समस्या आहे हे त्यांनीच विचारावे हि महाराजांची अपेक्षा होती. म्हणून ते वाट पहात होते. कृष्णा उद्याच्या, या महाकाय सामराज्याच्या एकमेव उत्तराधिकारी होत्या. त्याना तीक्ष्ण बुद्धीचे वरदान मिळालेले होते. पण अजून पोर वयाचं. अनुभव नगण्यच होता.
महाराजांना पोरींचा उदासवाणा चेहरा बघवेना. त्यांनीच आपला हट्ट सोडला.
“राजकुमारी कृष्णा, अशा आमच्या समीप या.”
कृष्णा जवळ आली.
“कृष्णा, आपण अश्या उदास का? आम्ही केव्हापासून पहातोय. आपले काहीतरी बिनसले आहे! काय झालाय ते, कळेल का आम्हाला?”
“तात, आम्हास कोणी तरी त्रास देतंय!” कृष्णाने शेवटी तोंड उघडले.
कृष्णकुंभ महाराजांचे बाहू ताठरले. मस्तकाची शीर कपाळावर तांडव करू लागली. दोन्ही हाताच्या मुठी आवळ्यागेल्या! कृष्णेला त्रास कोण देतंय? तिच्याकडे वक्र दृष्टीने पाहण्याचं धारिष्ट तरी आहे का कोणात?
“काय? तुम्हास त्रास? कोण आहे तो?” क्रुद्ध आवाजात कृष्णाचे ‘तात ‘ गरजले.
“त्या प्रकाश शलाका! ती सूर्याची पिल्लं! आमच्या अस्तित्वालाच त्यांनी आव्हान दिलंय!”
“कृष्णा आपण विश्वाच्या कोणत्या कोपऱ्या बद्दल बोलताय?” या कृष्णा विश्वात कोठे कोठे खेळावयास जातात कोणास ठाऊक?
“तात, आपल्या राज्यात एक चमकदार निळा ग्रह आहे. तो दुरून खूप मोहक वाटला, म्हणून आम्ही काही काळ, तेथे विहार करण्यासाठी गेलो होतो. तेथलीच हि कथा संगतीयय!”
कृष्णाचे उत्तर ऐकून महाराज सैल झाले. एका किरकोळ ग्रहाची बाब होती तर. सूर्य नामक छोट्याश्या ताऱ्या भोवती घाटमळणारा एक नगण्य ग्रह! पृथ्वी!
“त्या सूर्याच्या पिल्लांनी, नेमका काय त्रास दिला?”
“ते न अंगावर धावून येतात! अन म्हणतात कि ‘आम्ही अंधकार नष्ट करतो! आम्ही तुला पण उजेडात बदलून टाकू!” कृष्णा हिरमुसली होऊन म्हणाली.
“या अंधःकार साम्राज्याच्या भावी शासनकरतीस, अशा समस्या याव्यात हे आमचे दुर्दैव! आपणास अजून, आपल्या सामर्थ्याची आणि अक्षर अस्तित्वाची कल्पना नसावी? हरकत नाही. आता आम्ही, ती तुम्हास करून देतो!”
कृष्णकुंभमहाराजानी चिमुकल्या कृष्णेचे बोट हाती धरून, तिला आपल्या सोबत, त्या कृष्ण विवराच्या राजमहालाच्या उंच बुरुजावर घेऊन आले. तेथून कृष्णेला दाहीदिशेला दाटलेला काळाकुट्ट अंधाराचा महासागर दिसत होता. तेथे आकाश, धरती असा, पृथ्वी सारखा भेदभाव नव्हता! होता तो फक्त अंधक्कार! नाही म्हणायला दूरवर काही मिणमिणते, तारे चमकत होते. या साऱ्या अंधःकारावर आपल्या तातची सत्ता आहे, याचा कृष्णेस अभिमान वाटून गेला.
“कृष्णा, आपली नजरच नाही, तर कल्पनेच्याही पलीकडे आपले म्हणजेच, काळोखाचे साम्राज्य आहे! अथांग आणि अनंत! खरे तर हे शब्दही तोकडेच पडतील!”
“तात, मग त्या पृथ्वीवर प्रकाशाचे एव्हढे स्तोम का?”
“बेटा, ते त्यांचे एक चिमुकलं जग आहे! तेथील जीवश्रुष्टीचं अस्तित्व प्रकाशावरच अवलूंबून आहे! म्हणून ते प्रकाशपूजक आहेत! ते त्यांच्या दृष्टीने ठीक आहे!”
“तात, तितकी समज मला पण आहे! त्यांनी उजेडाचे गोडवे खुशाल गावेत! पण आपल्याला, म्हणजे अंधाराला हिणवून, गौण गृहीत घरून का?”
“कृष्णा, आपण बुद्धिमान आहेत. इतरांस गौण, क्षुद्र हिणवून कोणीच महान होत नाही! आता आपण तुमचा प्रश्न सोडवू. सूर्य हाअनंत ताऱ्यांनपैकी एक आहे. त्याची त्याचा भोवती फिरणारी ग्रहांची मालिका आहे. त्या सर्व ग्रहांच्या केंद्र स्थानी तो असून, त्याने आपल्या आकर्षणाने त्या ग्रहांना बांधून ठेवले आहे. त्याचा मालिकेतील प्रत्येक ग्रहावर त्याचे महत्व असणारच, त्यात तुमचा तो निळा ग्रह पण आलाच! असे अगणित सूर्य आणि त्याच्या पेक्षाही अजस्त्र तारे आपाल्या ग्रहांच्या ‘कुटुंब ‘कबिल्या सह आपल्या या काळोखाच्या पोटात फिरत आहेत!आणि याही पलीकडे अश्या अनेक अश्या अनॆक ताऱ्यांची एक ‘आकाश गंगा ‘ बनते. अश्या आकाशगंगांचा महासागर या अंधःकाराच्या एखाद्या कोपऱ्यात पडून असतो! थोडक्यात, आपणास आपल्या व्याप्तीची कल्पना यावी म्हणून हे सारे सांगणे आले. दुसरे अत्यंत महत्वाचे. तुमच्या त्या प्रकाश शलाकांचा जन्म सूर्याच्या ज्वलनातून होतो. ज्याचा जन्म होतो, त्याचा मृत्यू हि अटळ असतो! प्रकाशाच्या जन्मदात्याचाहि, महाविस्फोटातूनच जन्म झालाय, म्हणून त्याचा सुद्धा लय होणारच. तोही कधी तरी विझून जाईल! तेव्हा तुम्हास धमकावणारे ते प्रकाश किरण पण मरून जातील! पण तुमचे, माझे आणि या अंधाराचे तसे नाही. आपण अनंत आहोत! आपणास जन्म नाही! म्हणून मरणही नाही! आपले अस्तित्व कालातीत आहे!
” मग,तात, ती पृथीवरील मानव जमत अंधाराचा द्वेष का करतात? आणि वर त्याला ‘नकारात्मकता ‘पण जोडून टाकतात!”
“वेडाबाई, विकसित बुद्धी असलेली मानव जात पृथ्वीवर आहे. प्रकाशाला ‘सकारात्मकता ‘ लावताना, अंधाराला ‘नकारात्मकता ‘ चिटकली आहे इतकेच! अंधार प्रकाशाच्या विरुद्ध कधीच नसतो, तर तो सहायक असतो! मूळ काळोखानेच प्रकाशाचे महत्व अधोरेखांकीत होत असते! अंधक्कार सर्वत्र असतोच! तो कदाचित प्रकाशाने उजळून निघेल हि, पण नष्ट कधीच होणार नाही!! तेव्हा स्वतःहाच्या अस्तित्व शक्तीवर विश्वास ठेवा! आणि निर्भय व्हा!”
कृष्णाच्या सर्व शंकांचे निरसन झाले. म्हणजे अंधार असणं वाईट नसत तर!
— सु र कुलकर्णी,
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय, पुन्हा भेटूच, Bye.
Leave a Reply