परकिय देतात खूप मोठा मान
स्वकिय करतात एकसारखा अपमान
परकिय करतात हो खूपच आदर.
स्वकियांना नाही मुळीच कसलीही कदर
बाहेरचे लावतात किती प्रेमाने माया.
घरच्या साठी मात्र जन्म घालवला वाया
अनेकंनी जोडली अनेक नाती.
नेमकी स्वकियांनी याचीच केली माती
पण देवाच्या दारी नसतो कधीच अंधार.
कुणाच्या तरी रुपाने देतो तो शाब्दिक आधार आधार
देवाच्या काठीला नसतो कसलाही आवाज.
एक दिवस असा येतो की क्षणात उतरवतो माज
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply