“तुम्ही हे जहाल वीष कुठून आणि कसं मिळवत?” यशवंतने प्रशन केला.
“मी ते माझ्या शाळेतून घेतलं. म्हणजे, मी ज्या शाळेत केमिस्ट्री हा विषय शिकवते, तिथून” रजनीने उत्तर दिलं.
“मला नी़ट खुलासेवार सांगा. ” यशवंत.
“या शाळेत मिस मलकानी नांवाची एक बाई स्टोर- इन चार्ज आहे. मी तिच्याकडे ते मागितलं. तिन मला सावधगिरीचा सल्ला देऊन कांहींशा नाखुषीनेंच ते मला दिलं. रजिस्टरवर माझी सही घेतली.” रजनीने खुलासा केला.
“तुमच्या आधी ते वीष कोणी मागून घेतलं असावं, हे तुम्ही सांगू शकाल कां?”यशवंत
“नाही हो, मला खरंच माहीत नाही.” रजनी.
” तुमची एखादी मौल्यवान वस्तु हरवली आहे कां?” यशवंतने अचानक प्रश्न केला.
“नाहीं” रजनीने उत्तर दिलं.
“ठीक आहे, तुम्ही आत्ता जाऊं शकता” यशवंत म्हणाला.
“मग मला तुम्ही अटक करणार नाहीं?” रजनीने आश्चर्याने विचारलं.
“नाहीं. ते मग पाहूं” असं म्हणतांनां यशवंतच्या चेहेर्यावर हंसू उमटलं.
नानू आणि रजनी घरी परतले.
*********
“तूं माझ्यावर रागावलायंस?” घरी आल्यावर रजनीने नानूला विचारलंं.
“छे , उल़़ट मला तुझ्याबद्दल अभिमान वाटतो. पोलीसांना न भीता तू सामोरी जातेस याचा अभिमान वाटतो” नानूने उत्तर दिलं.
“तुला न सांगता परस्पर मी एव्हढी मोठी झेप घेतली, याबद्द्ल तुला राग आला नाही?” रजनीला रडूं आवरलं नाही.
“तू जे केलंस, त्याहीपेक्षा तूं निर्भीडपणे प्रसंगाला तोंड देत आहेस ह्याचं मला कौतुक वाटतं गं ! भिऊं नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” तो म्हणाला.
**********
बाळकृष्ण शिर्के आणि त्याची नवपरिणित पत्नि अनुराधा दोघे नुकतेच लोनावळ्याहून हनीमूनची मौज घेऊन परतले होते.
“हुश्श……! थकलो बुवा…..! लोणावळ्याच्या थंड हवेनंतर मुम्बईचा उकाडा….!” बाळकृष्ण – ऊर्फ बाळू म्हणाला.
“हो . पण खूप मज्जा आली …. !” अनू म्हणाली.
दाराची घंटा वाजली.
“अनु, बघ गं, कोण आलंय ते” बाळूने बसल्या जागेवरून विचरलं. अनूने दार उघडलं.
“इथे बाळकृष्ण शिर्के रहातात कां?” आलेल्या व्यक्तीने विचारलं.
“कोण आलंय ?”बाळूने विचारलं.
“पोलीस” अनू म्हणाली.
“मी यशवंत दळवी ” आलेल्या व्यक्तीने ओळख दिली.
“यशवंत, ये रे ये. अगं अनू भिऊं नकोस, हा माझा जुना मित्र आहे. पोलीसांत मोठ्ठ्या हुद्द्यावर आहे. यश, तूं अनूला माझ्या लग्नात पााहिलं असशील नां?” बाळूने खुलासा केला.
“अरे दोस्ता, तूं प्रथमच आला आहेस पण मी तुला साधा चहा सुद्धा औफर करूं शकत नाहीं. आम्हि नुकतेच लोणावळ्याहून आलो”. बाळू अजीजीने म्हणाला.
“चहा राहूं दे रे, मी कामानिमित्त आलो आहे” यशवंत.” मी ही वस्तु आणली आहे, ही तुमची आहे कां, हे विचारायचं होतं.” असं न्हणत यशोवंतने खिशातून एक नेकलेस काढली.
“अय्या, ही माझीच नेकलेस. कुठे सांपडली? मी शोधतच होते !” अनूू अधीरतेने म्हणाली. “मला देणार नां?”
“त्या करतां तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. बाळू, तुम्ही दोघे उद्याच या” असं सांगून यशवंतने निरोप घेतला.
“या, पोलीस स्टेशनवर तुमचं स्वागत आहे” यशवंतने शिर्के दांपत्याचं स्वागत केलं.
“हं.काय formalities आहेत, त्या करतो. तो हार दे बघूं” बाळूने घाई केली.
“अरे हो, इतकी काय घाई काय आहे?” यशवंतने विचारलं.
“हा हार तुमचाच आहे- म्हणजे अनुराधा शिर्के यांचा आहे हे सिद्ध करावं लागेल. ” यशवंत म्हणाला.
” हे काय, कालंच तर मी म्हंटलं- हा हार साझा आहे” अनू उतावीळ झाली.
“हो, नां, मग इतका किंमती हार तुम्ही कसा गमावलात? कुठे हरवलांत किंवा चोरीला गेला की काय, हे सांगा”
“मला नीट आठवत नाहीं हो, पण मी कित्येक दिवस शोधत्ये आहे” अनु म्हणाली.
“मी तुमची मदत करतो. हवालदार सावंत, दोन कप चहा मागवा.” यशवंतने सावंतला इशारा केला.
— अनिल शर्मा