कथ्यक नृत्यांगणा व अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांचा जन्म १ एप्रिलला झाला.
अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नी असलेली सुखदा खांडकेकर ही देखील अभिनेत्री तसेच ती कथ्थक नृत्यांगणादेखील आहे. अभिजीत खांडकेकरने फेब्रुवारी २०१३ रोजी सुखदा सोबत विवाह केला आहे. अभिजीत व सुखदा दोघेही मुळचे नाशिकचे आहेत. ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. तसेच तिने तेरी भी चूप या नाटकात काम केले आहे. या नाटकात तिच्यासोबत प्रियदर्शन जाधव मुख्य भूमिकेत होता.
आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री नृत्यांगना सुखदा खांडकेकर हिंदी रंगभूमीही गाजवत आहे. तिची ‘देवदास’, ‘कनुप्रिया’, ‘डूबधान’, ‘धारा की कहानी’ आणि ‘उमराव’ अशी पाच हिंदी नाटकं गाजली आहेत. ‘धरा की कहानी’ या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. संजय लीला भन्साळी यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात सुखदाने काम केले आहे. या चित्रपटात बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.
सुखदाने गुरूकूल, उमराव अशा अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सुखदा एक उत्तम भरतनाट्यम डान्सर आहे आणि अभिनयासोबतच ती नृत्याचे अनेक शोसुद्धा करत असते.
सुखदाचा युट्यूबवरील ‘अनसेन्सॉर्ड’ हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे.
सुखदा सोशल मीडियावर सक्रीय असून ती वेस्टर्न व ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर करत असते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply