“ चंद्रहासोज्वळकरा शार्दुलवरवाहना
कात्यायनी शुभ दद्धदेवी दानवघातिनी ”
अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रपतिपदेपासुन सुरु होणार्या नवरात्रात मा दुर्गेच्या नउ रुपांची उपासना केली जाते, त्या नवशक्तींच्या
रुपांपैकी सहावे रुप म्हणजे कात्यायनी होय. कत नावाच्या ऋषींच्या पु्त्राचे नाव कात्य, हेच पुढे कात्यगोत्र प्रसिद्ध झाले. कात्य यांच्या पुत्राचे नाव, विश्वप्रसिद्ध कात्यायनऋषी होय. कात्यायन ऋषींनी भगवतीची कठीण तपस्या केली. कठीण उपासनेमुळे प्रसन्न होउन, कात्यायन ऋषींच्या ईच्छेप्रमाणे, भगवतीने त्यांच्या घरी जन्म घेतला. त्यामुले देवीला कात्यायनी असे संबोधले जाते.
देवीचे स्वरुप मातेप्रमाने वात्सल्यमय व सर्व प्राणीमात्रांचे पालनपोषण आणि संगोपन करणारे आहे. सिंहावर आरुढ देवी चतु्र्भुज असुन, एक उजवा हात अभयमुद्रेत आहे व दुसरा वरमुद्रेत आहे. एका डाव्या हातात कमळपुष्प व दुसर्या हातात तलवार आहे. या दिवशी साधकाचे मन आज्ञाचक्रात केंद्रीत असावे. देवीच्या उपासनेने धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते. अलौकिक तेज प्राप्त होउन भय, रोग, संकटांपासुन मुक्ती होते.
महिषासुर या दानवाचा उत्पात वाढल्याने, ब्रम्हा-विष्णु-महेश या त्रिदेवांनी आपला तेज व पराक्रमाचा अंश देऊन देवीला उत्पन्न केले. अश्विन कृष्ण चतुर्दशीला कात्यायन ऋषींच्या घरी जन्मलेल्या या देवीची, कात्यायन ऋषींनी अश्विन शु. सप्तमी, अष्टमी व नवमीला पुजन केले. त्यानंतर देवीने दशमीला महिषासुर दैत्याचा वध केला, त्यामुले देवी महिषासुरमर्दिनी नावानेही विख्यात झाली.
दैत्य शुंभाच्या आज्ञेनुसार हिमालयावर आक्रमण करणार्या, चंड-मुंड या दैत्यांच्या वधासाठी देवीच्या डोळयांतुन कालिकादेवी प्रकटली. चित्त्यांचे वस्त्र व नरकरवंट्यांची माळ धारण करुन कालिकादेवीने चंड-मुंड दैत्यांचे मर्दन केले. चंड-मुंड दैत्यांच्या वधामुळे देवी पृथ्वीतलावर चामुंडा नावाने विख्यात झाली.
कात्यायनी स्तोत्रपाठ
कंचनाभा वराभयं पद्मधरा मुकटोज्जवलां।
स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनेसुते नमोअस्तुते॥
पटाम्बर परिधानां नानालंकार भूषितां।
सिंहस्थितां पदमहस्तां कात्यायनसुते नमोअस्तुते॥
परमांवदमयी देवि परब्रह्म परमात्मा।
परमशक्ति, परमभक्ति,कात्यायनसुते नमोअस्तुते॥
Leave a Reply