नवीन लेखन...

शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती

पं. अजय चक्रवर्ती यांच्या कन्या कौशिकी चक्रवर्ती. त्यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९८० रोजी झाला. पतियाळा घराण्याचे गायक पंडित अजय चक्रवर्ती, आई चंदना चक्रवर्ती संगीत शिक्षक, घरातच गाणे, वयाच्या २ र्याी वर्षापासून तिने आपल्या वडिलांकडे संगीत शिकण्यास सुरूवात केली. ऋतुपर्ण घोष या रेनकोट, चोखेर बाली अश्या चित्रपटाचे प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शकाने केलेल्या प्रमुख नायिकेची ऑफर दिली होती.पण त्याला नकार देउन कौशिकी चक्रवर्ती ने शास्त्रीय संगीत शिकण्यास प्राधान्य दिले.

कौशिकी २००६ मधील त्यांच्या पहिल्या मैफलीच्या आठवणी सांगताना म्हणते, एक दिवस मी घरी असताना दूरध्वनी वाजला. मी तो घेतला. ‘मैं भीमसेन जोशी बोल रहा हूँ. इस साल हमारे यहाँ पूना आना पडेगा’ असा पलीकडून आवाज आला. पंडितजी मला दिसत नसले तरी मी जागेवरच उभी राहिले होते. कौशिकीसारख्या गायिकांच्या हातात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सुरक्षित आहे, अशी खुद्द पं. भीमसेन जोशी यांनी दिलेली पावती हे कौशिकीचे यश आहे. आज तिचे नाव या क्षेत्रातील तपस्या तसेच सौंदर्य या दोन्ही मुळे देशविदेशात गाजत आहे.

तिचे पती पार्थ देशीकान हे स्वतः उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांच्या परंपरेतील उदयोन्मुख गायक असून त्यांनीही कौशिकीप्रमाणेच आपले सासरे पं.अजय चक्रवर्ती यांचेच शिष्यत्व पत्करले आहे. कौशिकीने देशात परदेशात अनेक मैफीली गाजवल्या आहेत. गाणारं सौंदर्यच हे! जे तिचे कार्यक्रम बघतात ते तिचे फॅन होतात.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..