खंत वाटली मनास
कळला नसे व्यवहार ।
शिकला सवरला
नाही जाणला संसार ।।१।।
पुढेच गेले सगे सोयरे
आणिक सारी मित्रमंडळी ।
घरे बांघूनी धन कमविले
श्रीमंत झाली सगळी ।।२।।
वेड्यापरी बसून कोपरी
रचित होता कविता ।
कुटुंबीय म्हणती त्याला
कां फुका हा वेळ दवडीता ।।३।।
सग्यांच्या उंच महाली
बैठक जमली सर्व जणांची ।
श्रेष्ठ पदीचा मान देवूनी
कौतुके झाली कवितांची ।। ४।।
व्यवहारी निर्धन जरी तो
विराजमान मनीं दुजांचे ।
ईश्वरी चैत्यन्न स्फुरले जे जे
गुंफूनी ठेविले हार तयांचे ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply