मी कविता का लिहितो
हे मला खरंच कळत नाही..
मीच, मला घातलेलं कोडं
कांही केल्या सुटत नाही !
कारण जिच्यासाठी मी
रात्रीचा दिवस करतो,
आणि लिहितो, तिच्या पर्यंत
त्या कधीच पोहोचत नाहीत..
आणि माझ्या व्याकुळ मनाची
परत घालमेल नको,
खपली निघायला नको म्हणून,
मी ही त्या परत वाचत नाही..
तरी हि मी लिहितो…..
का लिहितो कळत नाही
लिहायच नाही हे रोज ठरवतो
पण….रात्र होताच लिहू लागतो
विदीर्ण जखमी मनातून
कविता प्रसवत राहते …
रक्त बंबाळ अंतःकरणातुन
शब्द शब्द स्त्रवत राहते……
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
Leave a Reply