अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
मैत्रीच्या घट्ट नात्याने जमलेल्या
दुधावरची साय असतं
तासंतास शाळेच्या आठवणीत रामल्यावर
भावनांच्या मंथनातून निघालेलं लोणी असतं
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
बऱ्याच वर्षांनी अचानक
शाळेतील क्रश समोर दिसताच
हृदयाच्या आतून उमटलेले
हाssssय असतं
तरीही मनातलं दुःख बाहेर न दाखवता
हसून केलेलं हाय असतं
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
मित्रांसोबत अड्डा जमल्यावर
आपसूकच कनेक्ट झालेलं वाय फाय असतं
स्वतःची आतली परिस्थिती कशीही असली
तरी बाहेर दाखवताना एकदम हाय फाय असतं
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
आपला मित्र त्याचं दुःख सांगत नसला
तरी नुसती नजरा नजर होताच
या हृदयीचं त्या हृदयाला कळतं
त्याच्या मनात नेमकं काय डाचत असतं
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
रोजच्या जीवनात कभी खुशी-कभी गम
सहन करत आयुष्य पार पडायचं असतं
पण मित्राची थाप पाठीवर पडतांच
आनंदाच्या लाटांवर स्वार होऊन
पुन्हा नव्यानं fresh होवून
जग रहाटीत मिसळून जायचं असतं
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
आपण कामाच्या कितीही धावपळीत असतो
पण मित्राचा फोन आला तर
त्याच्या नुसत्या हॅलो शब्दाला ऐकून
त्याला काय म्हणायचंय हे जाणायचं असतं
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
या GT ला टाटा करताना
पुढच्या GT ला भेटेपर्यंत
आठवणींचं गाठोडं बांधून
मनात लॉक केलेलं फिक्स डिपॉझिट असतं
अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
हे तर आपलं सर्वस्व असतं
हे तर आपलं सर्वस्व असतं.
@ मी सदाफुली?
✍️ संध्या प्रकाश बापट
Leave a Reply