शब्दभावनांची जुगलबंदी
उमळुनी, येते काव्यानंदी
ऋणानुबंध ते मनहृदयीचे
काव्या गुंफिते आत्मानंदी
शब्दभावनां मनी जपाव्या
कृतज्ञतेचे, व्रत परमानंदी
शब्द! सारे दान सरस्वतीचे
कवीत्व! कृपाळू ब्रह्मानंदी
शब्दात सुगंधा माळीत जावे
जगवावे मनामना स्वर्गानंदी
व्याकुळ! होता शब्दभावनां
विरघळते, प्रीती काव्यानंदी
काव्य अव्यक्त हितगुज सारे
भावनांच सोज्वळी तृप्तानंदी
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १२५
२८ – ९ – २०२१.
Leave a Reply