नवीन लेखन...

कविवर्य वि. वा. शिरवाडकर

कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला.

वि.वा.शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन करत. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्नण असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणाऱ्या आणि आपला ठसा उमटविणाऱ्या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. शिरवाडकरांचे वडील शेतकरी होते. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.

कुसुमाग्रजांनी उठा उठा चिऊताई सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या गहन कविताही लिहिल्या. ’काढ सखे गळ्यातले’ सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि’जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती’ हे स्पष्टोक्तीचे परखड बोलही त्यांचेच. या महान साहित्यिकाचा काव्यव्यासंग अथांग असला तरीही कुसुमाग्रजांचे नाव घेताच डोळ्यापुढे उभा राहतो तो एक ओजस्वी क्रांतिकवी आणि कानी ऐकू येतो गगनभेदी जयघोष, ’गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ कवी कुसुमाग्रज हे खऱ्या अर्थाने ’क्रांतिकवी’. वयाच्या अवघ्या विशीत कुसुमाग्रजांनी अनेक तेजस्वी क्रांतिकाव्ये लिहिली, हुतात्मा चंद्रशेखर आझाद, हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू, हुतात्मा सुखदेव, हुतात्मा महावीरसिंह या सारखे महात्मे आपले दिव्य करून गेले. क्रांतिकारकारकांच्या बलिदानाची महती गाणारी क्रांतिगीते कुसुमाग्रजांनी लिहिली आणि त्या महात्म्यांची ध्येयगाथा जगाला सांगितली. जे काही ते क्रांतिकारक स्वतः सांगू शकले नव्हते मात्र करून गेले होते ते महान कार्य या क्रांतिकवीने घराघरात व मुखामुखात पोचवले.

कुसुमाग्रजांचे विशाखा, समिधा, किनारा, हिमरेषा, मराठी माती, वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी यासारखे कवितासंग्रह आणि नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, कौतेंय या सारख्या नाट्यकृतींचा अभ्यास अजूनही होत आहे. ‘गर्जा जयजयकार’ सारखी कविता लिहून क्रांतिवीरांना स्फुरण देणाऱ्या कुसुमाग्रजांनी ‘काढ सखे गळ्यातले, चांदण्याचे तुझे हात’ सारखी कविताही लिहिली. ‘नटसम्राट’मधून नाटय़रसिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आणि ‘कल्पनेच्या तीरावर’ सारख्या कादबंरीतून त्यांना खळखळून हसायलाही लावले.

१० मार्च १९९९ रोजी कुसुमाग्रजांचे निधन झाले. कुसुमाग्रज यांना आदरांजली.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..