माणूस म्हणाला..
कावळ्याला’..
एकदा माणूस म्हणाला..
कावळ्याला’..
कसे सांगायचे रे यांना,
बाहेरचे खाऊ नका…
पितृपक्ष चालू झाला,
घरच्या शिवाय जेवू नका..
‘कावळा म्हणाला..
माणसाला’..
‘कावळा म्हणाला..
माणसाला’..
अरे हे बुद्धीमान मनुष्या..
पंधरवडाच फक्त आठवणीने,
नैवद्य खिडकीवर असतो… !
बाकीचे ३५० दिवस मात्र आम्ही,
उकिरड्यावरचं बसतो रे .. !
पुण्य मिळवायच्या आशेवर..
ठेवलास तू घास छतावर..
जिवंतपणीच सांभाळ रे बाळा..
तुझ्या वृध्द पालकांना..
जिवंतपणी त्यांची सेवा करून ..
आणि त्यांचे आशिर्वाद घेऊन ..
पुण्य मिळेल हमखास बाळा..!
जातीपाती विसरून, गोरगरिबांना
दान करून, गरजू ना मदत करून..
गाठी पुण्य कमवशिल हमखास रे .!
‘कावळा म्हणाला..
माणसाला’..
जे का रंजले, गांजले..
त्याशी म्हणा जो, आपुले…
तोचि साधु ओळखावा..
देव तेथे ची जाणावा…!
— गणेश उर्फ अभिजित कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग
Leave a Reply