कवितेनेच मला जगविले
नकळे कुठुनी कानी आली
मधुरम, मंजुळ हरिपावरी
मुग्ध कविता उमलु लागली…
प्रारब्धाचे जरी भोग भाळी
काव्या ही सावरित राहिली
ओंजळीतली भावशब्दफुले
अर्थ जीवनाचा सांगु लागली…
अंतरीची निर्मळ शब्दभावनां
गीतातुनी, झुळझुळू लागली
शब्दपाकळ्यात भुलुनी जाता
कविता मज जगवित राहिली…
त्या कवितेला न तमा कुणाची
सत्याविष्कारी ती दंगुनी गेली
स्वानुभूतीच्या हृद्य संवेदनांना
शब्दाशब्दातुनी गुंफित राहिली…
वि.ग.सातपुते( भावकवी )
( 9766544908 )
रचना क्र. २७२
२६/१०/२०२२
Leave a Reply