शब्दा सहज वेचुनी फक्त लिहावे
झटपट, हवेतसे मुक्त गुंफीत जावे
काव्य म्हणुनी शब्दां उधळीत जावे
सत्यार्थ! जीवनाचे कुणी सांगावे.
काव्याभ्यास! वाचन,चिंतन, मनन
साधना आत्मचिंतनी सद्भाव असतो
शुकासारखे वैराग्य,वशिष्ठापरी ज्ञान
तिथे वाल्मीकी जैसा कवी जन्मतो
ज्ञाना, तुका, नामा, नाथा, कबीरा
समर्थ रामदासा,सांगा कोण वाचतो
धर्म ग्रंथांचा सांगा अर्थ कोण जाणतो
मूलमंत्र! मानवतेचा कोण जाणतो
मन प्रांगण! शब्दाक्षरी मनभावनांचे
संस्कारी शब्दस्पर्श वेदनांना शमवीतो
शब्दशब्द, सुखसंवेदनांचेच मोरपीस
भावकाव्य! शांतीचा सागर असतो
काव्योत्पत्ती यज्ञ! शब्दची समिधा
स्पर्श मनभावनांचा शब्दात बरसतो
अल्पशब्दी घनाशय,सर्वश्रेष्ठ प्रतिभा
ते कवित्व, साहित्यात्माच असतो
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना:-क्र. ९६.
२९ – ३ – २०२२.
Leave a Reply