नवीन लेखन...

काव्य हा साहित्यातील सर्वश्रेष्ठ प्रकार

वाङ्गमय निर्मितीला प्राचीन परंपरा आहे. अनेक प्रकारचे वाङ्गमय सर्वश्रुत आहे..कुठल्याही राष्ट्राची आद्य ओळख म्हणजे तेथील संस्कारीत साहित्य . प्राचीन संस्कृत साहित्य म्हणजे भारतभूमिचा विशाल , अथांग सागर असलेला साहित्यसंस्कारीत वारसा आहे . या साहित्य संस्कारांची शास्रीय , प्रतिभावंत परंपरेची महनीयता ही आद्य कवी व्यासांच्या समर काव्यापासून मानली जाते . अशा सहित्यश्रुंखलेची व्याप्ती प्रचंड आहे . संस्कृत भाषा तर सर्व भाषांची जननी आहे . आणी तिचे श्रेष्ठत्वही अबाधित आहे . मनुस्मृती पासून जर विचार केला तर त्याचे जीवनातील अनन्यसाधारण महत्व आपल्या लक्षात येते .

आपले प्राचिन ग्रन्थ रामायण , महाभारत , देखील महाकाव्ये आहेत. महाकवी वाल्मिकी , यांच्या नंतर महर्षी व्यासच संतश्रेष्ठ कवी झाले आणी त्यांच्या काव्याला आर्षकाव्य म्हणतात. महर्षी व्यासमुनी यांचेकडून एकही विषय लिहायचा राहिला नाही की ज्याला त्यांनी स्पर्श केला नाही . म्हणूनच ” व्यासोच्छीष्टम जगत सर्वम असे म्हटले जाते .

संस्कृत कवी , कवीकुलचुडामणी महाकवी कालीदासाची साहित्य संपदा ही विलक्षण , उत्तुंग , प्रासादिक , वाङ्ममय आहे . त्या बरोबरच महाकवी अश्वघोष , पंडित कवी भारवी आचार्य कवी भट्टी राजकवी माघ राजकवी हर्ष * हे ही महाकवी होऊन गेले आहेत. या सर्वांबद्दल मी माझ्या महाकवी कालीदासादी वाङ्ममय या पुस्तकात सारांशरूप व्यक्त केले आहे .

साहित्य हे वैश्विक आहे.थोडक्या म्हणजे अल्प शब्दात आपल्या अंतरातील सारा भावकल्लोळ व्यक्त करणं म्हणजे कवीता . तर अत्यंत अल्प मनभाव किंवा एखादी छोटिशी घटना व्याप्त (विस्तृत्व) स्वरुपात शब्दबद्ध करणे म्हणजे लेखन मग ते ललित असेल कथा असेल कादंबरी म्हणजे साहित्य . पण साहित्यातील असणाऱ्या सर्व प्रकारात सर्वश्रेष्ठ प्रकार म्हणजे काव्य !

साहित्य ही तपश्चर्या आहे !
काव्य हाच साहित्यातील सर्वश्रेष्ठ प्रकार आहे .
कवीता करता येत नसते ..तर कवीता जन्मावी लागते .
साहित्यकला मानवी जीवनातील मंजुळ रुणझुणणारी बिरुदं आहेत . त्याचा नाद सातत्यांन निनादित राहावा या साठी आपण साहित्य सरस्वतीची निस्पृह तपश्चर्या करावी .
कारण साऱ्या ब्रह्मांडात सदैव चैतन्य प्रफुल्लित करणारा तोच एकमेव मूलमंत्र आहे असं मला वाटत …!
आचार्य अत्रे यांनी आपल्या आयुष्याबद्दल लिहिले आहे की ..
” काय मौज आहे ! आयुष्य म्हणजे !…
प्रचंड मौज तीला अंतच नाही !!
पण कोणाला ?…
जो बघेल त्याला !…जो भोगेल त्याला .!
डोळ्यांना ढांपणे बांधून घाण्याभोवती फ़िरणाऱ्या बैलांना कुठली आली मौज ?…
त्यांना आयुष्य म्हणजे काळोख आणी कंटाळा..!
आयुष्य म्हणजे मानेवरचं जोखड़ !!
“तात्पर्य ! जीवनातील रसोक्तर्षाला स्पर्श करताना किंवा त्याचा आस्वाद घेताना बैल बनू नका ..!!!
…. *निदान ऑस्करचा नयनरम्य सोहळा अनुभवताना तरी.. सौन्दर्य उधळणारी धुंद रात्र पहा…!..सौंदर्य उधळणारी रात्र पहा..!!!!

लेखन हे अभिजात मुक्त स्वातंत्र्य आहे ..! फक्त त्या लेखनाला सुसंस्कृत संस्कारांची प्रबोधात्मक सुंदर अशी झालर असावी ..की जे लिखाण वास्तववादी आणी वाचनीय असेल.
लेखन ,साहित्य हे वैश्विक आहेच ! त्याला कुठल्याही भाषेचे बंधन नाही ..! सर्व लेखन साहित्यातील मौलिक विचारांचे प्रकटीकरण , सादरीकरण यातील वास्तवी वैचारिकता हाच मुळ गाभा असतो . शब्दान्ना शब्द जोडून केवळ लिहिणे म्हणजे साहित्य किंवा काव्य नसते… नव्हे.. अभ्यासक ,आश्वासक , आदर्शवत , असं लिहिणं ही एक तपश्चर्या आहे ..लेखनात खुप विविधता आहे ,प्रत्येक लेखक किंवा कवी यांचा स्वतंत्र बाज आहे , विशिष्ठ घाट आहे . तो किति समृद्ध आहे याचा विचार करुन त्याचा दर्जा समजतो ….
प्रत्येकाची लेखनशैली ही प्रतिभावंत असतेच , ती आपण सर्वानीच समजून उमजून घेतली पाहिजे ……..

तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती ही साहित्यिक ( कवी/लेखक)असु शकते ..कारण प्रत्येक जीवनच एक स्वतंत्र कादंबरी आहे ! कथा आहे! कवीता आहे ! फक्त मुक्त व्यक्त होण्याची गरज असते ..हे ज्याला जमते ते लिहितात हेच सत्य आहे .जीवन जगताना सहवासात वाटयाला आलेले अनुभव ,दृष्टांत , आपल्याला जेंव्हा जेंव्हा अंतर्मुख करतात विचारशक्ती जागृत करतात ते भावविचार शब्दरूपाने आपण कुठल्या नां कुठल्या रूपांन .कुणी कथेच्या, तर कुणी कवीतेच्या , गीतांच्या किंवा लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करतो ..लिहितो त्यातूनच साहित्य निर्मिती होत असते !..घन आशय सर्वारथाने अल्प मर्यादित स्वरुपात व्यक्त करणं म्हणजे कवीता / गीत . तर छोटा ( सुक्ष्म) आशय हा विस्तृत पद्धतीने मांडणं म्हणजे कथा / कादंबरी / साहित्य असते हे तर सर्वश्रुत प्रकार आहेत ……
शब्दमनभाव सुर ताल यांचे थवे जीवनात सातत्याने श्रावणी घनमेघा सारखे येत असतात . बरसतात …अगदी टपटप गारांच्या वादळी पाऊसासारखे …

त्याच शब्दमनभाव,कल्लोळाच्या स्फटिक गारा कवी , लेखकांनी अधिरतेने क्षणाचाही विलंब न लावता वेचायला हव्यात …अन त्याचा आनंद ,आस्वाद स्वतःही घ्यावा आणी इतरांनाही देत रहावा . लिहित जावे ..! लिहित जावे ..! शब्दानच्यावर कधीही अन्याय करु नये ..ही शब्दभावनांची गंगोत्री आहे . तिच्यात प्रसन्नतेंन डुंबलं पाहिजे मग अंतरमन जीवनाच्या चिदानंदात तन्मयतेंन कृतार्थ झाल्याची जाणीव होते हे मात्र खरं ! प्रत्येक कवी/लेखकाच्या बाबतीत हेच घडत असते…साहित्यिकाचा जन्म होत असतो ……जाणकारांनी नवोदितांना कमी न लेखता सदैव मार्गदर्शन करीत रहावे ….ही एक छोटी अपेक्षा !
वाचकाने साहित्यिकाचे अंतरमन जाणुन घ्यावे लागते , एका वाचनात किंवा श्रवणात ते अंतरमन वाचका पर्यन्त पोहोचते असे नाही ….बा .सी मर्ढेकर – चित्रे – ग्रेस यांचे साहित्य वाचकांना गुढ किंवा दुर्बोध कां वाटते हे यावरून लक्षात येते.
” केशवसुत यांनी म्हटल्या प्रमाणे साहित्य ( काव्य/लेखन) हे आकाशाची वीज असते !……..
तर गोविंदाग्रजांनी म्हटल्या प्रमाणे अशी वीज ज्या झाडावर पड़ते ते झाड़ हसत हसत मरण स्वीकारते.

… लेखन हे कधीच ठरवून होत नसतं ! अंतरातून वास्तव असा भावनिक विचार जन्मावा लागतो. त्याला विषयाचे बंधन नसते ..!
Poetry is a spontaneous overflow of powerful feelings recollected in tranquility.
– William Wordsworth
( From the ‘Preface’ to the ‘Lyrical Ballads’, 1798).
अहो जिचा जन्मच काळजात होतो आणी वाचल्यावर जी थेट काळजात जाऊन विराजते ती कविता…
शंभर शब्दांचा अर्थ अगदी एका ओळीत अगदी सहजपणे सांगून जाते ती कविता.
मूक मनांचे संवाद हे अंतरी पाझरत असतात ..त्या निर्मळ पाझरांची मंद झूळझुळणारी अशी परस्पर हॄदयांतील सप्तसुरांची सपमर्पित अशी नादमधुरता, अवीट प्रीतगंधी सात्विक भावनांची जाणीव करुन देतात . …हे वास्तव फक्त जाणले पाहीजे ….मग त्यातून सुंदर अभिजात नवरसरंगी भावनोत्कट काव्य जन्मते.
शब्द हे देवदान असते !
जेंव्हा ओंजळीत पड़ते ,तेंव्हा पटकन झेलावे , तो क्षण परत कधी येत नसतो ..!!
फुल उमलतांना आवाज नसतो पण सुगंध व सौंदर्य त्याच्या बरोबर येत असते. तसे कवितेचे असते. भावनांचा सुगंध व शब्दांचे सौदर्य घेऊन जन्मते.
अनेक ज्येष्ठ कवी/ कवयित्री होऊन गेलेत. त्यांच्या सहज सुलभ रचना आजही जनसामान्यांच्या ओठावर आहेत. हे सर्वांनाच मान्य करावे लागेल..
काळजातून प्रसवलेले शब्द हे अंती सहृदयी व्यक्तीच्या काळजाला स्पर्श करतात ही वास्तवता आहे.. हे आपण सारस्वतांनी नाकारून चालणार नाही.
उमेचे रमेचे जसे शारदेचे
जपध्यान तैसे तुझे जन्मदेचे
तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास
तुझ्या वंदितो माऊली पाउलांस * गदिमा
म्हणतात तर..
ज्येष्ठ कवीवर्य कै. लोककवी मनमोहन नातू म्हणतात.

उसे असावे गरुड पिसांचे
पिसे असावे ज्ञानेशाचे
बुडू बुडू घागर बुडूनी जावी
आणी तीरावर छाटी दिसावी
तर
शव कवीचे जाळू नका हो..
जन्मभरी तो जळतच होता
फुले तयावर उधळू नका हो..
जन्मभरी तो जळतच होता.
अशा अनेक रचना आहेत. त्याचा आपण आस्वाद घेऊन वाचन , मनन , चिंतन ,करून लिखाण केले पाहिजे .आत्ममुख होवून आपण लिहिले पाहिजे असे मला वाटते.
मराठी भाषेतील साहित्य खूपच सुंदर आहे .
काही शब्द हे द्वयअर्थी असतात ..हे सर्वश्रुत आहे .परंतु आपल्या वैचारिक प्रबोधनात्मक लेखनामध्ये कधिकधी तुलनात्मक सूचक शब्द वापरताना त्या शब्दाचा शक्यतो विपरीत अर्थ कुणी काढू नये म्हणून त्यासाठी समानार्थी शब्दांचा विचारपूर्वक उपयोग करावा , ते सहज शक्य ,सुलभ असते…अशा पूरक शब्दासाठी मराठी भाषा समृद्ध आहे …उत्तम विचार संस्कारप्रचुत उत्तम सार्थ शब्दांनी काव्य तसेच लेखन अधीक परिणामकारक होत असते. काव्यातील शब्दलालित्य हे मनभावणांर असाव ….असं मला वाटतं !!! नमस्कार ..

विगसा..

— वि.ग.सातपुते (भावकवी)

(9766544908) 

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..