ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा ।
उपसतो जरी सतत, होत नसे निचरा ।।
गोड पाणी शब्दांचे, ओठी अमृत वाटे ।
पेला भरता काठोकाठ, काव्य हृदयी उमटे ।।
पेला पेला जमवूनी, कलश भरून आला ।
नाहून जाता त्यात, देह भान विसरला ।।
सांडता पाणी वाहे, परसते चोहीकडे ।
आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply