आद्य वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो असे महान कवि, गीतकार, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर माडगूळकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ चा. त्यांची जन्मशताब्दी आज संपन्न होते आहे.
त्यांनी बालगंधर्वांविषयी लिहिलेल्या ओळी (असा बालगंधर्व आतां न होणे) सुप्रसिद्ध आहेत. त्याच धर्तीवर मी गदिमां विषयी स्वरचित कांही ओळी खाली देत आहे.
असो भावगीतें, असो भक्तिगीतें
असो लावणी वा असो चित्रगीतें
जशी युद्धगीतें तशी बालगीतें
जसे गीतगोपाल वा रामगीतें
समोरी उभे शब्द जोडोनि हात
रामासमोरी जसे रामदूत
तुझ्यामागुती पोरके आज गाणें
असा ‘काव्यगंधर्व’ आतां न होणे
रचयिता : सुभाष जोशी, ठाणे
………………………………………………………………………………….
इथे मला सांगायला आनंद होतो आहे, कीं वरच्या काव्यांत शेवटच्या ओळीत माझा शब्द होता ‘असा ‘काव्यसम्राट’ आतां न होणे’. पण सुप्रसिद्ध व्याख्याती आणि निवेदिका अनघा मोडक यांनी मला तो शब्द बदलून ‘काव्यगंधर्व’ शब्द लिहायला सांगितला, तो इतका सुयोग्य आहे कीं मी त्यांची सूचना तात्काळ मानली आणि सदर बदल केला. (ज्यांचे श्रेय त्याला द्यायलाच हवे).
………………………………………………………………………………….
विनंती विशेष –
कृपया नोंद घ्यावी, कीं माझे वरील काव्य मी या आधीच माडगूळकर कुटुंबियांना पाठवून दिलेले आहे, त्यामुळे कोणीही त्याचे आपणहूनच मातृत्व-पितृत्व स्वीकारून, अगदी आपपरभाव न मानतां तें दत्तक घेऊन आपल्या नांवावर पुढे कुठेही पाठवूं नये, ही नम्र विनंती. (हे लिहायचे कारण असे कीं ब-याच जणांना असे अनुभव आलेले आहेत हेही सर्वांना विदित आहेच)
— सुभाष जोशी, ठाणे
Leave a Reply