नवीन लेखन...

काव्यानुभव

फळ आज हे मधूर भासते,  तपोबलातील अर्क असे,
कष्ट सोसले शरिर मनानें,  चीज त्याचे झाले दिसे ।।१।।

बसत होतो सांज सकाळी,  व्यवसाय करण्या नियमाने,
यश ना पडले पदरी.  पाठ फिरविली नशीबाने ।।२।।

निराश मन सदैव राहूनी,  मनीं भावना लहरी उठती,
शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती ।।३।।

लिहिता असता भाव बदलले,  त्यात गुरफटलो पुरता,
छंद लागूनी नशाच चढली,  जीवनामधील रंग बघता ।।४।।

त्या रंगाच्या छटा उमटल्या,  फुला फुलातूनी दिसूनी येती,
सप्त रंगाचे मिलन दिसले,  आकाशाच्या क्षीतीजावरती ।।५।।

काव्यावरती जगेल कोण,  हवी भाकरी जगण्यासाठी,
मानहानी ती सदैव होई,  केवळ अल्पशा पैशापोटी ।।६।।

मदत कुणाची मिळत होती,  आला दिवस जाई निघूनी,
काव्यातील आनंदात ,  डुबता सारे विसरूनी ।।७।।

विवंचना आणि सुख दु:खे, बनली होती स्फूर्ती देवता,
अनुभवले जे जे आजवरी, चित्रीत झाले बनूनी कविता ।।८।।

अनुभव होता तनामनाचा, म्हणूनी भासले सत्य काव्य ते,
उचलून घेतले जनसामान्यांनी, मनास त्यांच्या पटले होते ।।९।।

लपली असती कला एक ती, सर्व जणांच्या अंतरंगी,
परिस्थितीशी झगडा देऊनी,  बाहेर आणती कुणी प्रसंगी ।।१०।।

गेलो विसरूनी उदास दिन ,  आज उमटले चित्र निराळे,
सरस्वती नि लक्ष्मी दोघी,  आशीर्वाद त्यांचा मिळ ।।११।।

— डॉ. भगवान नागापूरकर 
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..