एकलव्यापरीं शिकलो विद्या, गुरुद्रोणा विणा
काव्यामधल्या जाणून घेतल्या, साऱ्या खाणाखुणा
शोधू लागलो प्रथम गुरुला, पद्य रचनेसाठीं
कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही, राहून माझे पाठी
उठत होती भाव तरंगे, अन आकाशी भिडती
शब्दांनी परि पकड न येता, निष्टूनी ती जाती
मार्गदर्शक तो भेटत नाही, खंत लागे मना आता
व्याकूळ झाला जीव बघूनी, मनाची ही दुर्बलता
गोविंदाग्रज नि केशवसूत, आणिक ग.दि.मा.
तांबे- बोरकर- यशवंत, सर्वजण आले कामा
ग्रंथ तयांचे सारे जमवूनीं, एकत्र ठेवियले
शब्द भावना यांची सांगड, मन करुं लागले
द्रोण मुर्तिपरी भासूं लागली, त्यांची ग्रंथ संपदा
काव्यामधली स्फूर्ति मिळूनी, आनंदी झालो सदा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply