” काय कुत्र पाळताय ?”
शेजारच्या भुक्कड गोपाळरावांनी विचारल . सत्तरीच ह्डूक ,म्हणून सारी कॉलनी ‘राव ‘लावते . एकदम कनडम माणूस . कोणाचही बर न बघवणारा . सकाळी उठून याच तोंड बघितल कि दिवस खराब जातो . तोंड कशाला ? परवा सकाळी पाठमोरा दिसला , साहेबांनी उगाच झापला ! तोड पाहिलं असत तर पुण्याचा साहेब आला असता ! असा नग शोधून सापडत नाही ,पण मला न मागता शेजारी मिळाला .
‘आम्ही कुत्र नाहीतर गाढव पाळू ,तुम्हाला काय करायचय ?’ हे वाक्य मनात म्हणून टाकल .
“हो ,का ? ”
” अहो ,नका पळू , फार त्रासदायक असत ” गोप्या काकुळती येवून म्हणाला . त्याच क्षणी कुत्र पाळायच हा निर्णय घेऊन टाकला ! ,खर तर बायकोनी आधीच ठरवले होते .
“आमच आम्ही बघू . ” म्हणून त्याला कटवला . तो खांदे पाडून निघून गेला .
कुत्र . त्याच काय झाल कि ,काल रात्री ऑफिस मधून आलो ,तर बुटाच्या कोपऱ्यात माझे पांढरे कॅनवासचे बूट, दोन एवजी तीन दिसू लागले ! डोळे बारीक करून पहिल, तर मधला बूट हलत होता ! ते एक पांढरशुभ्र कुत्र्याच पिल्लू होत ,बुटाच्या बंदाबरोबर खेळत होत !
“अग … ” मी ओरडलो .
” ओरडू नका ,बाळान आणलाय पिल्लू !चान्गल्य ! असू देत !” बायकोने माहिती कम निर्णय सांगितला . सर्व संपल !मी काय बोलणार बापुडा !
त्याच संगोपन सुरु झाले . जुन्या बादलीत पोते ,त्यावर चादर टाकून बेड झाली . पाण्या साठी बशी . खोलगट डिश दुधासाठी . लवकरच ते पिल्लू घरात चांगल रुळल . लुटू -लुटू, मागे – मागे फिरणे , चमकदार डोळ्यांनी मान तिरकी करून पाहण , आम्हाला आनंददाई होत . सुरवातीला पोर त्याच्या गळ्यात दोरी बांधून फिरवत . मी हौसेने सुरेख पट्टा आणला . पण ‘दुनियाकी कोई ऐसी जेल नही बनी जिसकी दिवारे हमे रोक सके !’ या धर्तीवर तो स्वतःस मुक्त करून घेऊ लागला ! मग आम्ही नाद सोडला . दिसा मासान ते वाढू लागल . ऐटबाज दिसू लागल . बायकोला तर पोटच्या पोरापेक्षा ‘Tomy ‘चेच कौतुक फार ! त्याच बारस कधी झाल माहित नाही , माहित असते तर त्याच नाव मी ‘बोकील ‘ ठेवले असते ! ( हे आमच्या साहेबाचे नाव ,फार छळाय हो मला ! ) घरचे त्याला याच नावाने हाक मारत ,त्याला तो हि प्रतिसाद देई . मी त्याला डॉक्टर कडे नेवून त्याचे ‘लसी करण ‘करून आणले . त्याच्या साठी डॉग फूड आणले .जोमाने वाढी लागले .
‘कुठाय ते माकड ?’मी त्याला कधीच त्याचा नावाने हाक मारली नाही ! कारण त्याला अन मला त्याची कधीच गरज पडली नाही !माकड ,गाढव ,डुक्कर , बेकुफ ,काहीही म्हणा . पळत झेपा घेत असेल तेथून यायचं ! चारी पायावर उडी मारायचं ,माझ्या खांद्या इतकी उंच ! नॉन स्टोप शेपूट हलवत ! मग मी मुद्दाम त्याच्या साठी आणलेली दोन अंडी त्याच्या डिश मध्ये टाकली कि टरपला सकट खाऊन गडी खुश ! हो ‘गडी’च . चांगल कमरेइतक उंच झाल होत . डोळ्या जवळचा काळा ठिपका संपूर्ण डोळ्या भोवती पसरला होता . त्यामुळे डोळ्यावर काळा फ्लाप लावलेल्या समुद्री चाच्या सारख दिसू लागल होत ते धूड त्याच्या खोड्या वाढल्या होत्या ,आणि शेजाऱ्याच्या तक्रारी पण !
“एस आर ,तुझ कुत्र अवर रे ! काल बाईकला किक मारताना ,त्याने बाईक वर उडी मारली . मी अन बाईक दोघे हि पडलो ! साल तुमचे षोक होतात पण आम्हाला ताप !”
मग दिवसा कसेबसे बांधून ठेवण्याचा अपयेशी प्रयत्न केले . रात्री तर दहा नंतर गल्लीत क्र्फू !
एका लग्नात गेलो होतो . एक दूरचे मेव्हणे मला टाळताय असे वाटले . नीट बोलेनात .
“काय झालाय भावजी ? का मला टाळताय ?” शेवटी मी त्यांना गाठले .
” मग काय करू ? तुम्हाला पै -पाहुणा नकोसा झालाय .!”
“का ? काय झाल ?”
” ऐत्वारी परभणीस आल्तो . ”
“घरी का नाही आलात ?”
“घरीच आल्तो !”
” कधी ?रविवारी आम्ही घरीच होतो . किती वजता आला होतात ? ”
“रातीचे अकरा वाजले असत्याल . गाडी चुकली औरंगाबादेची ,म्हनुन मुक्कामी आल्तो ! ”
” दार का नाही वाजवल मग ?”
” कस वजावणारं ? दार लांब ऱ्हायल ,काम्पौंडच्या गेटच्या पन जवळ यु दिना तुझ कुत्र !”
बापरे आमच्या डुकरान यांना गेट बाहेरच अडवलं कि काय ?
“मग हाका मारायच्या . ”
“मारल्या ! तुमी भैरे ! ”
” अहो ,टी .व्हि . मुळे …. ”
“ते झाल तुमच ,मग मी एक खडा तुमच्या दारावर मारायला उचलला ,मनल तुमाला काळाव कि बाहीर कोन तर आहे ! पन खडा हाती घेउस्तोर तर ,तुमच ते धूड चीत्यागत उडी मारून मागच लागल ! पळालो झाल ! ठेसनात बाकड्यावर उपाशी पोटी निजलो !” त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला ,पण जमले नाही .
कोपऱ्यावरल्या चाम्भाराने मला एकदा हात करून थांबवले .
” काय पाहिजे ?” मी
” काय नाय ! लुकसानी केलीया तुमच्या कुत्र्यान !”
” काय केली ?”
” अवो ,शिवाया आलेल्या चपला ,म्या पाण्यात भिजू घातल्या व्हत्या ! डोळा चुकवून तेन पालीव्ल्या ! दोन रोज निक्क समुर गुमान साधू बाबा गत बसून असायचं !”
पाच -दहा रुपये देवून कशी बशी सुटका करून घेतली . घरी आलो तर ,
” तुमारे कोंबड्या कि काळजी तुमीच लेना !—-“असे काहीतरी म्हणत हि मागच्या गल्लीतल्या खालाशी भांडत होती .
“काय झाल ?”मी
“अहो ,हि बया आपल्या कोंबड्या निट सांभाळत नाही ,अन आता म्हणतीय कि टोम्याने एक मारून खाल्ली !”
“कुठाय ते गधड ! चांभाराच्या चपला पण पळवल्या ,तो पण …”
” पैले हमारी कोंबडी भरके देव !”
” कितने पैसे ?” मी डोके शांत ठेवत विचारले
“पैसे का माझ किसको दिखाते ?,मेकू कोंबडी के बदले कोंबडी होना !” खाला पेटली होती .
असले तनटे सुरु झाले कि हमखास Tomy गायब ! पण सवइने मला कळले होते ,तो माझ्याच पलंगा खाली लपून बसायचा ! तुम्ही म्हणाल इतक कुठही तोंड घालणार कुत्र तुमच्या स्वयपाक घरात … no way !बायकोने ‘मुडद्या ‘ म्हणून हात उगारला कि स्वारी पलंगाखाली !तो पण तिच्या धाकात होता .
एक दिवस रीतसर दाराची बेल वाजून ४२० वश्या आत आला ,त्याच्या मागे शेपटी हलवत आमच गाढव ! ४२० वश्या ,म्हणजे आमचे ‘मावेखोर’ मित्र ! ३००+१२०चा ताम्बकुचा, सध्याच्या बाजारात मिळणाऱ्या राजगिर्याच्या लाडू एवढा गोळा तोंडात कोंबून फिरणारा सुगंधी माणूस ! या वश्याला दोनदा बाईक सकट टोम्याने पडल्य , तीनदा प्यांट फाडली आहे , अन आज शेपूट हलवत सोबत कस ?
“वश्या तू अन हे माकड सोबत कसे ?”
“आता आम्ही फ्रेंड आहोत ! काय Tomkesh ?”शेपूट हलवत टोम्या गोल-गोल फिरला !
साधारण तास -दीड तास आम्ही यथेच गप्पा म्हणजे बोकील साहेबांच्या कुचाळया केल्या . वश्या निघाला तसे मी त्याला पुन्हा विचारले ” या भुताला कस वश केलस ?”
” काय नाही ,चार -दोनदा त्याला पण माव्याचा लाडू दिला . आता त्याला चटक लागलीय !”
म्हणजे मघाशी जे गोल-गोल फिरलं ते तम्बाकु मुळे ! आता मात्र कहर झाला ! हे कुत्र व्यसनी होत कि काय ?
सारे ठीक वाटत असताना माझी बदली झाली . घरासोबत tomy पण शिफ्ट झाला . पण नव्या जागेत नाही रुळला . तसा फिरायचा पण घरात ज्यास्त असायचा . एका रात्री नेहमी प्रमाणे बाहेर फिरत होता ,चोरांचा सुळसुळाट होता . सकाळी आला तो डोक्यावर जखम घेऊन ! कोणीतरी जबर मारले होते . जखमेत हळद भरली ,पण उपयोग झाला नाही , जखम चिघळलि , लाळ गळू लागली ,नजरेतील ओळख मंद झाली, सुळे दाखून गुरगुरू लागला ! कोणी तरी मुनिसिपालटीत तक्रार केली !दिवसभर पालिकेचे कर्मचारी त्याचा ‘खाऊ ‘ घेऊन फिरत होते . मी रात्री आलो .
“साहेब तो जवळ येत नाही आणि येऊ पण देत नाही ,आता तुम्हीच प्रयत्न करा .” असे म्हणत त्यांनी ती ‘खाऊ ‘ची पुडी मला दिली . त्यात काय आहे हे सांगायला ज्योतिष्याची गरज नव्हती . मी पुडी उघडली ,
“Tomy ” मी त्याला पहिल्यांदा आणि शेवटची Tomy म्हणून हाक मारली . थकलेला Tomy पलंगा खालून सावकाश बाहेर आला ,पुडीतले विषारी दोन पेढे त्याने मुकाट पणे खाल्ले , किंचित मान वळून माझ्या कडे पाहिले आणि घर बाहेर पडला , कधीच न परतण्या साठी !त्याच लाडान मांडीवर झोपण,उंच उडी मारून आनंदान नाचण ,भिऊन पलंगा खाली लपण ,चिखलात लोळून घरभर हुद्ड्न ,क्षणात डोळ्या समोरून सरकलं ! ज्या हाताने दुध पोळी खाऊ घातली त्याच हाताने आज ….
मी हताश पणे त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे पहात राहिलो !
— सुरेश कुलकर्णी
—आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . Bye पुन्हा भेटूच .