नवीन लेखन...

कायदा पाळा गतीचा (मार्मिक लेख)

माधव ज्युलीयन म्हणतात,”कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला.” ह्या ओळी गुणगुणतांना लहानपणी ऐकलेली ससा आणि कासवाची गोष्ट आठवल्याशिवाय रहात नाही.

“कायदा हा मोडायसाठी असतो”अशी जर मानसिकता असेल,तर कायदेपालन ही बाब गहनिय मुद्दा होऊन बसते.जुनाट कायदे मोडीत काढणे काळाची गरज आहे.निदान रोज एक जुना कायदा मोडीत निघायलाच हवा,कारण काळ बदलतोय.गुन्ह्याचं स्वरूप आणि त्याची तिव्रता बदलत आहे.

शहरीकरण होतांना नियोजन बद्ध होणे अत्यावश्यक होते,ते झालेच नाही.मुंबापुरी वाढतच राहिली,बेशिस्त गती वेग घेतच राहिली. ह्या गतीला कायद्याचं कोंदण असतं तर…

तर आज हीच मुंबापुरी विशिष्ट दिशेनी प्रगती पथावर जाणारी गतीशिल नगरी म्हणून नावारुपाला आली असती.
आर्थिक,सामाजिक, राजकीय ,तांत्रिक प्रगतीतील गती फायदेशीर ठरण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात *कायदेयुक्त गती*
आवश्यकच आहे.

ही सुरुवात व्हायला हवी ती वैयक्तिक पातळीवर.

प्रत्येकाला शैक्षणिक,आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, कलाकौशल्य याचा ध्यास लागलेला असतो.

परंतू *अतिगतिमानता* अशी गतीविषयक संकल्पना विकसित झाली तर मात्र असामाधानाचं शिगोशिग ममाप पदरात पडल्याशिवाय राहणार नाही.

अलसस्य कुतो विद्या,
अविदस्य कुत:धनम्।
अधनस्य कुतो मित्रम्,
अमित्रस्य कुतो सुखम्।।

असे जरी असले तरी उद्यमशिलतेच्या गतीला शिस्तबद्ध कियद्याची चौकट हितकिरकच ठरते.

— सौ.माणिक शुरजोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..