नवीन लेखन...

“किस” (KISS)

KISS - Keep It Simple Sweetheart!

बंगलोरच्या एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करत असताना माझी मोहन अय्यर या माणसाची गाठ पडली. तो त्यावेळी कंपनीच्या पर्चेस डिमार्टमेन्ट मधे पर्चेस मॅनेजर म्हणून काम करत होता. पण ही त्याची वरवरची ओळख होती. सर्वव्यापी परमेश्वरासारखा त्याचा कंपनीच्या प्रत्येक डिपार्टमेन्टमधे वावर असायचा. त्याचा कंपनीत बर्‍यापैकी दबदबा असायचा व तो डायरेक्टर्सच्या जवळच्या लोकांपैकी एक म्हणून ओळखला जायाचा. ही जर्मन कंपनी असल्याने कंपनीचे डायरेक्टर्स हेच या कंपनीचे सर्वो-सर्वा असायचे. या कंपनीच्या मॅनेजमेन्ट कॅडरमधील बहुतेक लोक ‘हायलीक्वालिफाईड किंवा एक्सपिरियन्स्ड’ होते. पण मोहन त्याला अपवाद होता. माझ्या माहितीप्रमाणे तो मॅट्रिकपर्यंतच शिकलेला होता व ही त्याची पहिलीच नोकरी होती. त्याची पर्सनॅलिटी सुद्धा अशी काही खास नव्हती. तो पांच फूट उंचिचा, किरकोळ शरिरयष्टी असलेला व फारसे न बोलणारा असा इसम होता. थोडक्यात तो काही फारसा ‘इम्प्रेसिव्ह’वाटत नव्हता. त्यामूळे मोहन अय्यरसारखा कमी शिकलेला व फारसा अनुभव नसलेला माणूस कंपनीचा मॅनेजर झाला याचा अर्थ तो नक्कीच वशिल्याचा तट्टु असेल किंवा वरती त्याचा कोणी ‘गॉडफादर’ बसला असेल अशी टिपिकल मध्यम वर्गीय मराठी माणसासारखी मला पण शंका येत होती. कारण त्यावेळी आमच्यासारख्या मध्यमवर्गीय मराठी मनावर ‘ओळख किंवा वशिला असल्याशिवाय नोकरी मिळत नाही. वरती कोणीतरी ‘गॉडफादर’ असल्याशिवाय नोकरीत प्रगती होत नाही. माणसाचे मेरिट, टॅलन्ट, बुद्धी, हुषारी, धडाडी, कर्तृत्व, प्रामाणीकपणा, मेहेनत याला काडिचीही किंमत नसते.’ असेच संस्कार झालेले होते. त्यावेळी निदान महाराष्ट्रात तरी तशीच परिस्थिती होती. मग सरकारी नोकरी असो किंवा खाजगी नोकरी असो, केवळ वशिला व गॉफफादर या एकमेव क्वालिफिकेशनवर अनेक नालायक मंडळी उच्चपदी पोचलेली मी पाहिल होती. मोहन अय्यर हा सुद्धा त्याच कॅटेगिरीतला असावा असे वाटत होते.

पण लवकरच माझा भ्रमनीरास झाला. मोहन अय्यर हा कंपनितला ‘प्रॉब्लोम सॉल्व्हर’ म्हणून ओळखला जात होता. कंपनीत कोणताही अवघड प्रॉब्लेम किंवा समस्या आली की ती मोहन अय्यरकडे देण्यात येत असे. मग तो आपल्या पद्धतीने त्या समस्येवर उत्तम तोडगा किंवा ‘वर्केबल सोल्युशन’ शोधुन काढत असे. त्यामुळेच त्याचा कंपनीत दबदबा होता व डायरेक्टर्सचा विश्वास त्याने संपादन केला होता.

मी त्यावेळी कंपनिच्या मार्केटींग व सेल्स विभागात काम करीत होतो. त्यावेळी एक मोठी समस्या आली होती ती ‘डेड स्टॉक इन्व्हेंटरी’ ची. डेड स्टॉक इन्व्हेंटरी म्हणजे कंपनीने तयार केलेला माल जो वर्षानुवर्षै कंपनिच्या गोडाऊनमधे पडून आहे. त्याची विक्री होत नाही किंवा मुव्हमेन्ट होत नाही. अशा प्रकारचा स्टॉक हा कंपनीला नुकसानकारक असतो. त्यावेळी कंपनीची ही ‘डेड स्टॉक इनव्हेंटरी’ 10 कोटी रुपयांच्या घरात पोचली होती. त्यावेळी कंपनीचा वार्षिक टर्न ओव्हर 80 ते 90 कोटी रुपयांचा होता. याचा अर्थ कंपनिची ‘डेड स्टॉक इन्व्हेंटरी’ कंपनीच्या टोटल टर्नओव्हरच्या जवळ जवळ 10 टक्के होती. हे कंपनीला परवडण्याजोगे नव्हते. यामुळे कंपनीच्या आर्थिक कामगीरीवर, बॅलन्स शिटवर व प्रॉफिटॅबिलिटीवर परिणाम होत होता. कंपनीचे ऑडिटर्सपण ही गोष्ट वारंवार कंपनीच्या निदर्शनास आणून देत होते. कंपनीच्या डायरेक्टर्सनीहा ‘प्रॉब्लेम’ धसास लावण्याचे ठरवले व कंपनीचे फारसे नुकसान न होता हीइन्व्हेंटरी कशी कमी करता येईल हे पहाण्याची जबाबदारी मोहन अय्यरवर सोपवली. यानिमित्ताने मला त्याचेबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

मोहन अय्यरच्या एकुणच काम करण्याच्या पद्धतीमूळे, त्याची विचार करायच्या पद्धतीमूळे व डेडिकेशनमूळे मी पार भारावून गेलो होतो. कोणतिही समस्या असो ती जास्तीत जास्त साधी, सरळ, सोपी व सुटसुटीत कशी करता येईल यावर त्याचा भर असायचा. त्याचे म्हणणे असायचे की कोणतिही समस्या ही मुळात सोपीच असते. आपणच कारण नसताना ही समस्या अवघड, गुंतागुंतिची, क्लिष्ट किंवा कॉम्प्लीकेटेड करून ठेवत असतो. बर्‍याच वेळा एखादी समस्या हे अनेक समस्यांचे मिश्रण असते. अशा वेळी प्रत्येक समस्या ज्याप्रमाणे कांद्याचा प्रत्येक पापुद्रा वेगळा करता येतो त्याप्रमाणे वेगळी करावी लागते. आमची ‘डेड स्टॉक इन्व्हेंटरिची समस्या अशाच पाच सहा समस्यांच्या मिश्रणामुळे निर्माण झाली होती. मोहनने आपल्या पद्धतिने या समस्या वेगवेगळ्या केल्या, या समस्या जेव्हड्या ‘सिम्पलीफाय करता येतील तेव्हड्या करण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम असा झाला की केवळ 6 महिन्यांच्या आतच 10 कोटीरुपयांची ‘डेड स्टॉक इन्व्हेंटरी 30 लाख रुपयांवर आली. बहुतेक मालाची कंपनिच्या डिलर्सतर्फे विक्री करण्यात आली. ज्या डिलर्सनी हा माल विकत घेतला होता त्यांना तो माल विकण्यासाठी कंपनिच्या सर्वीस इंजिनियर्सनी मदत केली. थोडक्यात मोहन अय्यरची ‘समस्या साधी, सोपी, सरळ व सुटसुटीत’ करण्याची क्षमता चांगलीच यशस्वी झाली. पुढे याने कंपनीत बरीच प्रगती केली व कंपनीचा डिव्हीजनल मॅनेजर म्हणून निवृत्त झाला.

त्यानंतर माझ्या असे लक्षात आले की जी माणसे आयुष्यात यशस्वी होतात त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर हीच क्षमता असते.

खरे म्हणजे आपल्या सगळ्यांकडेच ही क्षमता थोड्या फार प्रमाणात असतेच असते. आपल्यालाही साध्या, सरळ, सोप्या, सुटसुटीत व अनकॉम्प्लीकेटेड गोष्टी आवडत असतात. पण कारण नसताना आपण उगाचा सोप्या गोष्टी अवघड, गुंतागुंतिच्या, क्लिष्ट व कॉम्प्लिकेटेड करून ठेवत असतो. आपल्या शिक्षण पद्धतीमधे सुद्धा हेच शिकवले जाते. इतकेच नव्हे तर साध्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड करणार्‍या माणसाला आपण हुषार किंवा विद्वान समजत असतो.

माणसाच्या या क्षमतेसाठी योग्य असे नांव मला बरेच दिवस सापडत नव्हते. मी यासाठी बरीच मॅनेजमेन्टची पुस्तके पालथी घातली. पण नुकतेच इन्व्हेस्टमेन्ट बद्दलचे एक पुस्तक माझ्या वाचण्यात आले. आणि मला नांव सापडले.

‘किस’ (KISS)
याचा अर्थ
Keep It Simple Sweetheart!

बाबारे/ बाईग, कोणतीही गोष्ट असो ती साधी, सोपी, सरळव सुटसुटीत ठेव. उगीचच कारण नासताना ही गोष्ट अवघड, गुंतागुंतिची, क्लिष्ट किंवा कॉम्ल्पीकेटेड करू नकोस.

‘किस’ म्हणजे चुंबन ( मग ते ओठांचे असो, गालाचे असो, हाताचे असो नाहीतर शरिराच्या इतर कुठल्याही अवयवाचे असो.) माणसाचे प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा, आदर व्यक्त करण्याचा यापेक्षा साधा, सरळ, सोपा व अनकॉम्प्लीकेटेड मार्ग दुसरा कोणता असु शकेल?

तर ‘किस’ (Keep It Simple Sweetheart) चा आधार घ्या व आपले आयुष्य अधिक सुखी, समृद्ध, प्रगतिशील व अनकॉम्प्लीकेटेड बनवा.

अर्थात काय करायचे हे तुमचे तुम्हीच ठरवायचे आहे. कारण हे तुमचे आयुष्य आहे!

— उल्हास हरि जोशी

उल्हास हरि जोशी
About उल्हास हरि जोशी 31 Articles
श्री उल्हास जोशी हे गुंतवणूक विषयक सल्लागार असून ते Financial Health या विषयावर जनजागृती करतात. या विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. ते मेकॅनिकल इंजिनिअर असन ४० वर्षे मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात कार्यरत होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..