“संयम राखा… भरपूर उपभोगत आनंदी रहा…”
कोणे ऐके काळी म्हणायचे,” स्वताःच ठेवाव झाकुन… दुसऱ्याच पहाव वाकुन….”….
म्हणजे आजकाल या म्हणीला काही अर्थ उरलाय अस वाटतच नाही.. कारण स्वताः कडे असलेल आपण झाकुन ठेवण्यापेक्षा दुसऱ्यांकरीता ऊघडुन स्वताःच नाराज होतोत…..
म्हणजे एखादी वस्तु आपण नविन आणल्यावर भरपुर आनंदात असतोत… कारण तीच वस्तु ईतरांकडे नाही म्हणुन आनंदीच असतोत..
पण ज्या वेळेस आपल्या सारखीच किंवा आपल्याहीपेक्षा अद्ययावत वस्तु ईतरांकडे पाहील्यावर हल्ली काही प्रमाणात का होईना मन थोडफार नाराजच होत.
मग आपण आपणाकडे असलेल्या वस्तुचा पुर्णंपणे ऊपभोगण्याचा आनंद घेण्यापेक्षा आपल्यापेक्षा ही चांगली वस्तु दुसऱ्यांकडे आहे, याचे क्षणीक दुःखात अनेकवेळा अडकुन जातोत.. मग आहे त्या वस्तुचा ऊपभोग ही आपण फार काळ आनंदाने घेऊच शकत नाही… बरोबर ना….?
मग ती वस्तु मोबाईल, दुचाकी, चारचाकी वा ईतर कोणतीही असो… दैनंदिन वापरातली कोणतीही ….
का बर होत अस? कधी विचार करुन पाहीलय? याचे कारण नक्कीच तुम्हाला कळेल….
“सयंम …. ” हो सयंमच….
हल्लीच्या पिढीला सगळच काही लहान वयात, विना श्रम, कमी मोबदल्यात, विन्या अडथळ्याने, अद्ययावत तंत्रज्ञान्याच्या सहाय्याने व सुलभ हफ्ताने ऊपलब्ध होत असल्यामुळे त्यांना दैनंदिन वापरात हवी असलेली साधन सतत अपडेट होत असल्याने नविन पिढी सतत त्या वस्तुवर अमर्यादितपणे अवलंबुन राहत स्वताःवरील मानसिक व शारीरिक नियंत्रण हरवते आहे. याचा नीटपणे व सखोल विचार केल्यास नक्कीच लक्षात येईल..
हल्ली तर आज घेतलेली वस्तु ऊद्याच जुनी होऊन त्याहीपेक्षा नविन व अद्ययावत वस्तु बाजारपेठेत ऊपलब्ध होतेच. मग घेतलेल्या वस्तुचे मोल व ऊपयोग काय?
“संयम….”
हो… मंडळींनौ …. स्वताःच्या मनावर थोडेफार नियंत्रण ठेऊन त्या नविन वस्तुचा अगदी मनापासुन आनंद घ्या. काही काळ जावु द्यात. अद्ययावत वस्तुच्या मोहापासुन दुर ही रहा.
नक्कीच सुखावताल…..
म्हणजे मर्यादित किमंतीमध्ये घेतलेल्या वस्तुच्या मोबदल्यात तुम्ही जर “संयम” दाखवलात तर नक्कीच तुम्ही त्यापासुन अमर्यादित आनंद प्राप्त कराल… हे नक्कीच …. बघा प्रयत्न करुन… म्हणुनच
“संयम राखा.. भरपुर ऊपभोगत आनंदी रहा”
— विवेक जोशी
Leave a Reply