आज आपण येथे अशा एका फळाविषयी माहिती घेणार आहोत जे वर्षाचे बाराही महिने बाजारात उपलब्ध असते आणि सगळ्यांचेच आवडीचे आहे. आता तुमच्या मनामध्ये अशा सगळ्या फळांची नावे येत असतील जी वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असतात. पण काळजी करू नका मी तुमचा जास्त वेळ न घेता त्याचे नाव सांगूनच टाकतो. ते फळ आहे लिंबू! हे एक असे फळ आहे ज्याचा रस प्यायला आपल्या सर्वानांच आवडते. पण ह्याचे खूपच असे आपल्या शरीरासाठी गुणकारी फायदे आहेत. बहुतेक तुम्ही सर्वांनीच कुठे ना कुठे ते वाचले असतीलच पण पुन्हा एकदा आपण ह्या छोट्याशा फळाविषयी जाणून घेऊयात. हे फळ म्हणजे “मूर्ती लहान पण कीर्ती महान” असेच आहे. ते पुढे दिलेल्या लेखातून तुम्हालाही कळून येईलच.
उन्हाळ्यात लिंबूपाणी अगदी सर्रास प्यायले जाते. पण याचे फायदे आपल्याला नीटसे माहित नाहीत. पण फक्त लिंबूपाण्याने तुम्ही आरोग्याच्या अनेक समस्या दूर करु शकता हेही तितकेच खरे आहे. पण त्यासाठी लिंबूपाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला नीट ठाऊक असायला हवी.
१. लिंबूपाण्यात सॅट्रीक ऍसिड असते. त्यामुळे किडनीस्टोनला आळा बसतो. नियमित लिंबूपाण्याचे सेवन केल्यास किडनीस्टोनची समस्या कमी होण्यास खूपच मदत होते.
२. रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून घेतल्यास पचनतंत्र मजबूत होऊन अन्न लवकर पचते आणि आपले शरीर फिट राहण्यास मदत होते.
३. लिंबात व्हिटॉमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास खूपच मदत होते. नियमित लिंबूपाणी प्यायल्याने सर्दी-खोकलाची समस्यादेखील खूपच कमी होते.
४. तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असल्यास एक ग्लास लिंबूपाणी प्या. तोंडाची दुर्गंधीची समस्या तात्काळ दूर होईल. त्याचबरोबर तोंडही कोरडे पडणार नाही.
५. लिंबूपाण्यामुळे आपल्या शरीराचे मेटाबॉलिझम सुधारते. याशिवाय वजन कमी करण्यास मदत होते.
६. लिंबूपाणी बनवताना नेहमी ताज्या लिंबाचा वापर करा. कोमट आणि थंड पाण्यात बनवलेले लिंबूपाणी तुम्ही पिऊ शकता. त्याचबरोबर लिंबूपाण्याबरोबच जर तुम्ही संत्र, काकडी या फळांचे सेवन केल्यास अधिक फायदा होईल.
— संकेत प्रसादे
Leave a Reply