केला एवढा अट्टाहास,रसिका केवळ तुझ्यासाठी,
मांडली काव्याची आरास,
तुझ्याच फक्त आशीर्वादासाठी,
दत्तगुरूंचे धरून बोट,
लेक लिहीत गेली,
आईवडील, भाषाईने,
समृद्धी तिज दिधली,–!!!
माया करती मित्रवर्य,
शिक्षकांचे आशीर्वाद मागुती,
असे संस्कार,सहकार्य,
उभे राहिले बघा पाठी,–!!!
काव्यप्रेमी देती दाद,
त्यांची ममताच उदंड,
पावती देती रसिक,
कृपा त्यांची भरभरून, –!!!
त्यांच्या सदिच्छा-भेटी,
पत्रे शिवाय, संदेश खास,
खाऊ, फुले, आशीर्वादाची, मजजवळ जमली रास,–!!!
खरेतर हा सन्मान,
आपुल्या मराठी आईचा,
“मी”तर एक निमित्तमात्र,
माध्यम माझे फक्त समजा,–!!!
राहिले काही चुकून माकून,
तर, मीही एक मानव अपूर्ण, उदार अंत:करणाने माफ,
करावे रसिकजन हो आपण,–!!
Leave a Reply