ही १८६० सुमारातील गोष्ट आहे. त्या वेळी, पेट्रोलियम खनिज तेलाचा शोध’ नुकताच लागला, होता. पण, माणसाला त्याचा फारसा उपयोग नव्हता. तेव्हा युरोपमध्ये लोक प्रकाश मिळविण्यासाठी दिव्यामध्ये व्हेल माशाचे तेल वापरीत. ते खूप खर्चिक असे. त्याच वेळी खनिजतेलातून केरोसिन म्हणजे घासलेट तेलाचे उत्पादन सुरू झाले. अगदी दुसऱ्या वर्षापासून त्याची जगात इतरत्र निर्यात सुरू झाली.
आपल्या भारत देशात बर्माशेल कंपनीने १९०२ साली हे घासलेट तेल आणले होते. तत्काळी, केरोसिन हे सुरक्षित इंधन व्हावे, यासाठी त्यातील पेट्रोलसारखा पातळ द्रव काढून फेकून आज देत. पेट्रोलमध्ये केरोसिनची भेसळ होऊ नये म्हणून घ्यावी दक्षता लागते.
आज सर्वत्र – विजेच्या दिव्यांची रोषणाई असली तरी केरोसिन हे इंधन गरिबांच्या गरजेची वस्तू बनून आहे.
केरोसिन हे इंधन १२५ अंश सेल्सिअस ते ३०० अंश सेल्सिअस या तापमानादरम्यान उकळते. चांगले केरोसिन दिव्यात किंवा स्टोव्हमध्ये जळताना कमी धूर येत असतो. त्यामुळे, कंदिलाची काच पटकन धुरकट होत नाही. केरोसिनचा वापर स्वयंपाकघरात देखील होतो. केरोसिन जळताना प्रदूषण होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. यासाठी त्यात गंधकाचे प्रमाण कमीतकमी असावे याची काळजी घेतात. याशिवाय, त्यातील धूर ओकणाऱ्या सेंद्रिय रसायनांचे प्रमाण कमी ठेवावे लागते. या इंधनातील एरोमॅटिक्स वर्गातली हायड्रोकार्बन रसायनांमुळे, ते जळताना धूर येतो खरा, पण ही धूरओकू संयुगे त्यातून संपूर्णतया निपटून काढता येत नाहीत. कारण हीच रसायने जळताना वातीच्या ज्योतीला प्रकाशमान करतात. अर्थातच, जास्त उजेड मिळण्यासाठी काही प्रमाणात या एरोमॅटिक्स रसायनांचे अस्तित्व गरजेचे असते.
केरोसिन स्टोव्हमध्ये पंप करताना स्फोट होऊ नये म्हणून त्यात पेट्रोल नॅपथा सारखी पातळ इंधने मिसळणार नाहीत याची खबरदारी घ्यावी लागते. त्यासाठी त्याचा भडका बिंदू (फ्लॅश पॉइंट) कमीत कमी ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राखावा लागतो. या एकूण खबरदारीमुळे या इंधनाला ‘सुपिरियर केरोसिन ऑइल’ (एस.के.ओ.) या नावाने संबोधिले जाते.
जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply