केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संस्थापक केसरी पाटील यांचा जन्म १० एप्रिलला झाला.
पर्यटकांचे प्रेम आणि विश्वास यावरच गेली ३८ हून अधिक वर्षे ‘केसरी’ची यशस्वी वाटचाल सुरू आहे. आज केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या संस्थेमध्ये १००० हून अधिक माणसे कार्यरत आहेत. या कंपनीची वार्षिक आर्थिक उलाढाल ५०० कोटींपेक्षा जास्त आहे. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या संस्थेने १३ लाखाहून अधिक लोकांना त्यांनी सहल घडवून आणली आहे.
८ जून १९८४ साली केसरी पाटील यांनी १०० चौरस फूट जागेत फक्त त्यांची पत्नी व मुलांच्या व एक कारकून, टंकलेखनिकाच्या सहकार्याने केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या सहल कंपनीची स्थापना केली. आपल्या ध्येयांना आणि उद्देशांना पूर्ण करण्याकरिता त्यांना त्यांच्या पत्नी सुनीता यांचे संस्थापनेपासनच बहुमोल सहकार्य लाभले.त्यांच्यातर्फे मोठ्या संख्येने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहली आयोजीत केल्या जातात. केसरी टूर्स ची पहिली सहल राजस्थानला गेली होती. ज्यामध्ये तेरा पर्यटक होते. मध्यमवर्गीय आणि उच्च गध्यमवर्गीय अशा दोन स्तरांतले सर्व धर्मीय, देश-विदेशातील पर्यटक त्यांच्याबरोबर प्रवास करत असून पर्यटकांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे ते अधिकाधिक प्रगती करत आहेत. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील व झेलम चौबळ या त्यांच्या कन्या होत. २०१३ मध्ये केसरी टूर्स मधून वीणा पाटील बाहेर पडल्या व त्यांनी आपली कंपनी वीणा वर्ल्ड स्थापन केली. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ला ISO 9001-2000 आणि OHSAS18000-2007 ही प्रमाणपत्रे मिळाली होती. ही दोन्ही प्रमाणपत्रे मिळवणारी केरारी ही जगातील पहीलीच पर्यटन कंपनी होती.
केसरी पाटील यांना ट्रॅव्हल एक्सप्रेसचा जीवनगौरव पुरस्कार, श्री जीवनगौरव पुरस्कार,उद्योग श्री पुरस्कार, मराठी व्यापारी मित्रमंडळ पर्यटन उद्योग विकसन पुरस्कार, मोस्ट अंग्रेसिव्ह मार्कटिंग ॲवॉर्ड प्रदान व आय आय टी सी कडून महाराष्ट्र रत्न पुरस्कार, ‘बेस्ट इंडस्ट्रिआलिस्ट’पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
Leave a Reply