न्हाव्याने विचारले साहेब
कोणता कट मारू?
मी म्हणालो कोणताही मार
पण कटकट नको करू!
न्हाव्याने विचारले साहेब
गोविंदा कट का सचिन कट?
मी म्हणालो कोणताही चालेल
पण कर सगळं सफाचट
न्हाव्याने विचारले साहेब
दाढी मिशी पण करू?
मी म्हणालो दाढी भादर
पण मिशीला नको लावू कातर!
न्हाव्याने विचारले साहेब
करू का मालिश चांगला?
मी म्हणालो करायचं तर कर
पण नको करूस टकलाचा तबला
न्हावी म्हणाला आरसा भरून
साहेब, कसा दिसतोय कट?
मी म्हणालो बसा जरा खाली धर
टकलाचाच दिसतोय चांदोबा कट!
न्हावी म्हणाला साहेब
काखा वर करा मारतो बगल
मी म्हणालो अरे बाबा
काखा वर करून कसं भागल?
— विनायक अत्रे.
Leave a Reply