“डॉक्टर मॅडम……डॉक्टर मॅडम….!”
शेजारचा सुकेश पळतच माझ्या केबिनमध्ये घुसला.
“काय झाल? एवढा का घाबरलास सुकेश ?”
मी म्हणाले. तसा घाबरत घुबरत सुकेश माझ्याजवळ आला.माझ्या पुढच्या खुर्चीवर पाय उकड ठेऊन बसला.तो फार घाबरलेला दिसत होता.त्याच्या मनात काहीतरी गुंतागुंत चालली होती.त्याचा चेहरा घाबरून पांढराफटक पडलेला दिसत होता.मला त्याचं हे बावळट रूप पाहुण कसतरीच वाटलं.सुकेश माझ्या बाजुलाच रहायचा.विस पंचवीशीचा तरून असावा मात्र जख्ख म्हातारा दिसायचा.शरीरयष्टीने तो एकदम हडकुळा दिसत होता.शरीरात मांस असाव की नाही ईतपत संशय घेण्याजोगे त्याचे शरीर होते.अंगाची चामडी हडांवर घट्ट चिकटलेली वाटायची.तोंडाचं बोळकं झालेलं तर डोळ्याच्या खोबनितुन त्याचे पिवळट पांढरट डोळे लुकलुकत रहायचे.डोळ्यांच्या वर नाममात्र भुवया होत्या.तर असो.
“हा असा अचानक माझ्या केबिनमध्ये का घुसला असावा? काय झालं असेल? असा काय बरळतोय हा? ह्याच्या डोक्यावर काही परीणाम तर झाला नाही ना ?” मी मनातच स्वगत बोलत होते.
सुकेश अजुनही अस्वस्थपणे ईकडे तिकडे बघत खुर्चीवर अंग चोरून वरमुन बसला होता.त्याने आपल्या हाताच्या मुठीत काहितरी घट्ट पकडून ठेवले होते.तो मला फारच भेदरलेला अन अस्वस्थ दिसत होता.त्याचा अस्वस्थपणा पाहुन काहीतरी भयंकर झालय याचा मला अंदाज आला होताच.तसही आज माझा या हॉस्पिटलमधील शेवटचा दिवस होता.मागच्या पंधरा-विस दिवसांपूर्वीच मी ईथे ज्वाईन झाली होते आणि तेवढ्यातच माझी बदलीही झाली होती.पंधरा-विस दिवसांपासुन सुकेश माझा पेशंट होता.तो मला मिळालेल्या क्वार्टर जवळच्याच खोलीत राहायचा.अधुन मधुन माझ्याकडं यायचा.कधी कधी रहस्यमय असं बरळायचा.बर्याचदा तो स्वतःशीच काहीतरी बोलायचा.मी ईथं आल्यापासुनं तो माझा सर्वात जुना पेशंट होता.असो तर आज ईथे डॉ.टकले ज्वाईन होणार होते.मी आज माझा चार्ज देणार होते.तेव्हड्यात हा सुकेश माझ्या केबिनमध्ये घुसला होता.
मी टेबलवरची बेल वाजवली.तसा बनसोडे शिपाई पळतच केबिनमध्ये आला.मी त्याला हातातील पानी बॉटल हलवत पाणी आणण्याचा ईशारा केला.तसच चहा आणायलाही सांगितलं.बनसोडे माझा ईशारा समजला आणि आल्यापावली चहा व पाणी आणायला गेला.तसं मी सुकेशकडे बघीतलं आणि त्याला शांतपणे बसलेलं बघुन विचारायला सुरुवात केली. तस क्षणाचाही विलंब न लावता ईकडे तिकडे घाबरून बघत माझ्या कानाजवळ तोंड आणत अतिशय हळु अन सावध आवाजात सुकेश म्हणाला की,“ डॉक्टर मॅडम…..केसं ऽऽ……….केसं ऽऽ…..सगळीकडं केसच केसं……..!”
मी शांतपणे त्याच्या नजरेत नजर घातली.मी तशीच पुढे झाली आणि त्याचा हात हातात घेतला.मला त्याची नाडी विचीत्रपणेच पळायलेली जाणवत होती.ती माणवी नाडी वाटतच नव्हती…..जे काही जानवत होत ते सगळ अमानवी होतं…मी सहजच त्याच्या डोक्यावर हात ठेवला.तर हे काय मला आश्चर्याचा धक्काच बसला.आत्ता पाच मिनिटांपुर्वी तो माझ्या केबिनमध्ये आला असता त्याला ढळढळीत केसं होते.अन आत्ता मात्र माझ्या हाताला त्याच डोकं चक्क गुळगुळीत लागत होतं.मी खाली पाहीलं.फरशीवर त्याचे केसं गळुन पडलेले दिसले.एव्हाणा आत्ता ते सार्या केबिनमध्ये पसरले होते.नुसते पसरलेच नव्हते तर त्यांनी सारी खोली व्यापुण टाकली होती.हे असं का होतेय मी विचारात पडले.
“ती कोणाचेच केस ठेवणार नाही……जाणार …..सगळ्यांचेच केसं जाणार….ईथं असलेल्या सगळ्यांचेच केस जाणारं……..सगळेच्या सगळे गुळगुळीत टकले होणार…..ती येतेय……ती……..केशवा…..ऽऽऽ!!! केशवा यैतेय…..ऽऽऽ!……. ती बदला घ्यायला येतेयं…..बदला तिच्या केशवपनाचा …!”
“कोण ती” मी म्हणाले.
तस सुकेश खुर्चीवर उकड बसला अन माझ्याकडे बघुन मला अस्खलित गावठी मराठीत सांगायला लागला.
“डॉक्टर मॅडम ती केशवा हे….ती मह्या खोलीतल्या माळ्यावर रहाते….आंधी हातात टाचणी घेते….मंग त्या टाचणीनं डोस्क्यात टोचु टोचु छिद्र करते….त्या छिदरायलं मंग बिबुड्याच तेल लावते…..अन मंग त्या छिद्रातुन लांबच लांब…..एक मिटर…..दोन मीटर…कित्येक मिटर असे…..लांबच लांब केस उगवतात…..अन मग ‘ती‘’ ते केसं उपटुन नेते…..डोस्कं रक्तभंभाळ करून……!” हे सांगतांनी त्याचे डोळे एकदम भयंकर दिसत होते…..डोळ्यातल्या गोल काळ्या भावल्या आंकुचलेल्या दिसत होत्या.याचे हात पायच नाही तर संपूर्ण शरीरच थरथरत होतं….आच्या आवाजातही मला कंप जाणवत होता.
“अस काय झाल होत केशवा सोबत कि ती ईतकं क्रुर वागते…..ति डोक्याचे केसं का उपटुन नेते.” मी अस म्हणताच सुकेश आपल्या तंद्रीतुन बाहेर आला,अन रहस्यमल खलऽऽ खलऽऽ खलऽऽ हसायला लागला.त्याच हसु सगळ्या केबिनमध्ये पसरल होतं.अचानक हसता हसता तो गंभीर झाला अन ईकडे तिकडे पाहु लागला.क्षणभर केबिनमध्ये भयान शांतता पसरली.हे सगळं पाहुन मला विचीत्र अन किळसवाणं वाटायल लागल होत.अचानक त्यानं गाण्याचा हेल घेतला अन आपल्या जाड्या भरड्या आवाजात कर्कशपणे गायला लागला.
केशावा सौदर्याची खानं ऽऽ
तिचा लांब केशसंभार ऽऽ
तिल केसांचा अभिमान ऽऽ
केसं तिचे जिव की प्राण…!
आटपाटनगर व्हत एक छानं ऽऽ
तिथला नगरपाल थोराड ऽऽ
त्याची नजर पडली केशवावरं ऽऽ
त्यान बांधला लग्नाचा डावं….!
बाळ ईलुसी केशवा ऽऽ
दारी सजला मांडव ऽऽ
गणगोत जमल रे दारी ऽऽ
केशवा सजली नवरी…..!
नवरा नवरीचा खेळ ऽऽ
खेळ संसाराचा अवघडं ऽऽ
अवचित हरवलं बालपण ऽऽ
झाली लहानपणीच थोराडं…!
सरले चारदोन उन्हाळे ऽऽ
तसे सरले पावसाळे ऽऽ
एकादिशी घात झाला ऽऽ
तिचा राया काळाण नेला…..!
केशवालं आलं केशवपन ऽऽ
सासु ननंद आन गणगोतं
जमले केशवा भवतालं
केस काढं मने गुमानं…..!
सगळे केशवाभवती जमले ऽऽ
त्यांनी केसं तिचे हिसकावले ऽऽ
केशवा झाली हिन दिनं ऽऽ
तिन केला मग एक प्रणं…..!
केशवाचं केशवपन ऽऽ
तिच्या डोळ्यात उडला ईखार ऽऽ
जळत्या आगीत रायासंग ऽऽ
तिन कवटाळलं मरणालं…..!
जळतांनी तिन केला आक्रोश ऽऽ
तव्हापसुनचा तीचा प्रणं ऽऽ
ईथं येईल जो लहान थोर ऽऽ
घेईल त्याचे मी केस हरूनं….!
माडीवर माड्या सात ऽऽ
तिथं मांडल तिनं ठाणं ऽऽ
हेरी औसल शिकार ऽऽ
करी केसाच हरनं……!!!”
त्याच हे किळसवानं घोगर्या आवाजातलं गाणं ऐकुण मला हसु येत होतं पण ते न दाखवता मी म्हणाले,
“असं,तर मग चल मला दाखव कुठे आहे ती, केशवा…!”
मी अस म्हणताच सुकेशने आपल्या घट्ट मुठीतल्या टाचण्या अन बिबुडे माझ्या टेबलवर टाकले आणि खुर्चीवरून टुन्नकन उडी मारून माझ्या केबिनच्या माळ्यावर जाऊन बसला.मी त्याच्याकडे पाहिले…त्याच्या नजरेत एक वेगळीच ओढ,लालसा होती.मी त्याच्या नजरेत पहातच राहिले…नकळत माझे हात माझ्या डोक्यावरील केसांच्या विगकडे गेले.मी डोक्यावरचा विग काढुन टेबलवर ठेवला.मग अनायसेच माझे हात टेबलावर पडलेल्या टाचण्यांकडे गेले.माझ्या डोळ्यात आसुरी आनंद चमकत होता.माझ्या ओठांवर विचीत्र हसु होतो.मी एक टाचणी उचलली आणि टच्चकन माझ्या डोक्यात टोचली.मला खुप सुकुन मिळाला.मला वेदना जाणवतच नव्हती उलट आनंदच होत होता.त्या आनंदाच्या भरात मी एकेक टाचणी उचलुन डोक्यात टोचत होते.मला अविरत आनंद होत होता.या आनंदाच्या भरात मी बेभान होऊन माझ्या डोक्यात टाचण्या टोचत होते.एकेक टाचणी टोचतांनी मला स्वर्गीय सुख मिळत होते.माझं डोकं रक्तभंभाळ झाल होतं.आत्ता त्या छिद्रांवर मी बिबुडे फोडुन लावले.मला डोक्यात प्रचंड थंडावा जाणवत होता.आत्ता त्या प्रत्येक छिद्रातुन लांबच लांब केसं उगवत होते.लांबच लांब…….पहाता पहाता त्या सगळ्या खोलीत केसच केसं झाले होते.क्षणार्धात माझ्या डोक्याला झटका बसला.माझे केस गायब झाले होते.मी डोक्यावरून हात फिरवला.मला माझे डोके गुळगुळीत जाणवत होते…मी हसले…जोरजोरात हसले….हसतच राहीले….हसतांनी मी वर माळ्याकडे बघीतले…सुकेश तिथे दिसत नव्हता.मी टुन्नकन उडी मारूण समोरच्या खुर्चीवर जाऊन बसले….
एवढ्यात केबिनचा दरवाजा वाजला.डॉक्टर टकले आत येवुन खुर्चीवर बसले…त्यांनी टेबलवरची बेल वाजवली….शिपाई बनसोडे पळतच आला…त्याने केबिनचे दार उघडले.डॉ. टकलेंनी टेबलवरची पाण्याची रिकामी बाटली हवेत उडवली अन चहा आणि पाणी मागवले.त्यांनी प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले.मी रहस्यमयरित्या विचकट हसत माझ्या हातातील टाचण्या आणि बिबुडे टेबलवर टाकले.
“मला माझा चार्ज तुमच्याकडे द्यायचा आहे.” मी माझ्या जाड्या भरड्या घोगर्या आवाजात त्यांना म्हणाले.हे म्हणतांना माझ्या डोळ्यांच्या खोबणीतुन माझे लालसर पिवळट डोळे लुकलुकत डॉ.टकलेंकडे पहात होते.डॉ.टकलेंनी माझ्या नजरेत नजर घातली.खोल……एकदम खोल…… ते पहातच राहिले.मग नकळतच त्यांचे हात टेबलावर पडलेल्या टाचण्या अन बिबुड्याकडे गेले……ते पाहुन आत्ता त्यांच्या ओठावर आसुरी हावभाव दिसत होते…..त्यांच्या डोळ्यातही एक विलक्षण चमक दिसत होती……त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी आपल्या डोक्यावरील केसांचा विग काढला…..नकळत त्यांचा हात टेबलावर पडलेल्या टाचण्यांकडे गेला…त्यांनी एक टाचणी हातात घेतली आणि टच्चकन्न ऽऽ……!!!
© गोडाती बबनराव काळे, हाताळा, हिंगोली
9405807079
Leave a Reply